चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात शव घेऊन येणाऱ्या वाहनाने पाच जणांना चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास येथे घडली. यात मुमताज शेख (५७) व सुधीर गराडे(रा. गडचिरोली) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर  जखमी झाले. अपघाताच्या वेळी वाहनचालक गणेश दिलीप बम्बोडे (३२) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती असून  त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील गोपालपुरी येथे एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मृत महिलेचे शव खासगी वाहनाने शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात येत होते.तेथे रुग्णांचे नातेवाईक पहाटे परिसरात उभे     केल्याची घटना घडली होती. मृत महिलेचे शव खासगी वाहनाने शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात येत होते.तेथे रुग्णांचे नातेवाईक पहाटे परिसरात उभे असताना मृतदेह घेऊन येणाऱ्या वाहनाच्या चालकाने पाच जणांना धडक दिली. यात मुमताज शेख व सुधीर गराडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर  मीराबाई उपये (४५, रा. राजुरा), राजेंद्र कामडे (३१, रा. डोंगरगाव सिंदेवाही), शकीला पठाण (३५, रा. घुग्घुस) हे जखमी झाले. चालक नवशिक्या तसेच मद्यप्राशन करून होता, अशी माहिती आहे.

आर्थिक मदत देण्याची मागणी

या अपघातात मृत पावलेल्या मुमताज शेख व सुधीर गराडे या दोघांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, शालिनी भगत, विनोद संकत, निखिल धनवलकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांच्याकडे केली. तसेच मृत शेख यांच्याजवळील १५ हजार रुपये चोरटय़ाने चोरून नेले. ती रक्कम सुद्धा परत करावी अशीही मागणी केली.