20 January 2019

News Flash

कोल्हापुरात पाणी तापवण्यावरून सासऱ्याने सुनेसह नातवावर केला हल्ला

यात संशयितासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

पाणी तापवण्याच्या कारणावरून सासऱ्याने सुनेसह नातवावर चाकूने हल्ला केला. ही घटना कोल्हापूरमधील मल्हारपेठ गावात घडली. या चाकू हल्ल्यात संशयित आरोपीसह चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरात पाणी तापवण्याच्या कारणावरून संशयित पांडुरंग सातपुते आणि त्यांच्या सुनेमध्ये वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या पांडुरंग यांनी चाकू घेऊन सून आणि नातवावर हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत शुभांगी रमेश सातपुते, मयुरेश रमेश सातपुते, मनीषा रमेश सातपुते यांच्यासह आरोपी पांडुरंग दशरथ सातपुते हे देखील गंभीर जखमी झाले.

जखमींना कोल्हापुरातील प्रमिलाराजे शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पोलीस तपास करत आहेत. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

First Published on February 14, 2018 12:40 pm

Web Title: father in law attack on daughter in law for miscellaneous reason in kolhapur