लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : राष्ट्रीय छात्र सेनेच्यावतीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्याापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा मानद कर्नल कमांडंट पदाने शुक्रवारी सन्मान करण्यात आला. विद्याापीठातील कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमरावती विभागीय ग्रुप कमांडर ब्रिगेडियर एस.के. झा यांच्या हस्ते तीन स्टार, प्रमाणपत्र व बॅटन बहाल करून मानद कर्नल पदवी व एनसीसी कर्नल कमांडंट पदाने डॉ.विलास भाले यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात किर्ती भाले, कर्नल संजय पांडे, कर्नल राजनारायण, सुभेदार मेजर भुसारी, विद्याापीठाचे शिक्षण संचालक डॉ. महेंद्र नागदेवे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता उद्याानविद्याा डॉ. प्रकाश नागरे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे आदींसह अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला सिरसाट यांनी, तर आभार डॉ. दारासिंग राठोड यांनी मानले.