राज्यातील मान्सून जरी परतल्यात जमा असला तरी देखील कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला ‘क्यार’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याचे दिसत आहे.

आगामी दोन दिवसात ‘क्यार’ हे चक्रीवादळ कोकणासह गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. शिवाय या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांना व प्रशासनास सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत गुरूवारपासून मुसळधार पाऊस आहे. दमदार पावसामुळे या ठिकाणच्या अनेक भागात पाणी साचले असल्याने येथील जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने याचा फटका मच्छिमारांनाही बसला आहे. मध्यरात्रीपासून किनारपट्टीवर जोरादार वारा आणि पाऊस सुरू असून मालवण मधील देवबाग परिसरात समुद्राच्या उधाणाचं पाणी शिरलं आहे. त्यात आता आगामी दोन दिवसात ‘क्यार’ चक्रीवादळ येऊन धडकणार असल्याने येथील सर्वांचाच जीव टांगणीला लागलेला आहे. तर, कोकण किनारपट्टीवरील ग्रामस्थांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मच्छिमारांना दोन दिवस समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय, कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही काही दिवस कोकणात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.