News Flash

सांगलीत बिबट्या दिसल्याने खळबळ

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी

सांगलीमध्ये बिबट्या दिसला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील राजवाडा परिसरात बिबट्या दिसला आहे. सकाळी साडेसहा वाजता राजवाडा चौकातील पटेल चौक मार्गावरून आलेल्या बिबट्याने बंद बंगल्यात ठाण मांडल्याची चर्चा होती. यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. पाऊलखुणा मिळाल्याने बिबट्या आगमनाची पुष्टी झाली आहे.

बिबट्या दिसला असल्याची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या दिसल्याची बातमी पसरतात परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. अखेर पोलिसांना सुरक्षेची उपाययोजना म्हणून संचारबंदी लावावी लागली. डीवायएसपी अजित टिके घटनास्थळी उपस्थित असून प्राणीमित्रांची मदत घेतली जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 2:18 pm

Web Title: leopard seen in sangli sgy 87
Next Stories
1 “…मानसिक तयारी ठेवा”, राजेश टोपेंचा राज्यातील जनतेला इशारा
2 “चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की…”
3 पोलिसांवर हल्लाप्रकरणी चारशे जणांविरुद्ध गुन्हा
Just Now!
X