अलिबाग- रायगड लोकसभा मतदारसंघातील १३ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा खर्च निरीक्षक धीरेंद्रमनी त्रिपाठी यांनी तिसरा व अंतिम आढावा घेतला. यात सुनील तटकरे यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च केल्याची दिसून आहे. त्याखालोखाल अनंत गीते आणि कुमूदीनी चव्हाण यांनी प्रचारासाठी खर्च केल्याचे समोर आले.

हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना मिश्किल टोला; म्हणाले, “अरे बापरे! साहेबांचं किती उदार अंतकरण”

thackeray group leader sanjay raut slams pm modi
“उद्धव ठाकरे नकली संतान”, पंतप्रधान मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; म्हणाले, “अत्यंत दळभद्री…”
Dr Narendra Dabholkar Murder case pune court verdict
Narendra Dabholkar Murder : ११ वर्षांनंतर निकाल; दोन आरोपींना जन्मठेप, सबळ पुराव्याअभावी तिघे निर्दोष
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra News Today in Marathi
Lok Sabha Election 2024 : ब्रिजभूषण शरण सिंहांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश
sharad pawar raj thackeray
“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”, शरद पवारांचा टोला, ‘त्या’ टीकेवर दोन वाक्यात प्रत्युत्तर
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरील खर्चाचे नियंत्रण ठेवण्यासाठी उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाचा तीन टप्प्यात आढावा घेतला जातो. ज्यावर जिल्हा खर्च संनियंत्रण समिती देखरेख ठेवते. प्रचारावरील खर्च हा ९५ लाखांच्या आत असणे अभिप्रेत असते. निवडणूक यंत्रणाही उमेदवारांच्या प्रचारावरील दैनंदीन खर्चावर लक्ष ठेवून नोंदी ठेवते असते. उमेदवारांनी सादर केलेला खर्चाचा तपशील आणि शासनाने ठेवलेल्या निरीक्षकांनी ठेवलेल्या खर्चाचा तपशील पडताळून पाहीला जात असतो. उमेदवारांनी खर्च कमी दाखवला असल्यास शासकीय नोंदी नुसार वाढीव खर्च उमेदवारांच्या खर्चात जोडला जात असतो.

हेही वाचा >>> ‘शिंदे यांच्याकडील नगरविकास, रस्ते विकास खाती मी नाकारली’

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल दत्तात्रेय तटकरे यांनी ५६ लाख ८२ हजार ६२८ रुपये खर्च दाखवला होता. शासकीय नोंदवही नुसार तो ५८ लाख १७ हजार २६६ रुपये झाल्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे शासकीय नोंदीनूसार तटकरे यांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली, शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार अनंत गीते २७ लाख ६२ हजार २४७ रुपये खर्च दाखवला होता. शासकीय नोंदी नुसार ३० लाख ६४ हजार ९३४ रुपये झाले असल्याचे दिसून आले. त्यामुळे शासकीय नोंदीनुसार खर्चास मंजूरी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या कुमुदिनी रविंद्र चव्हाण ८ लाख ५५ हजार ६२५ रुपये, भारतीय जवान किसान पार्टीचे कर्नल प्रकाशराव चव्हाण ४६ हजार ३७९ रुपये, अजय उपाध्ये १ लाख ४९ हजार ९८०,  अमित श्रीपाल कवाडे अपक्ष ३८ हजार ८८२ रुपये,  अंजनी अश्विन केळकर अपक्ष ३५ हजार ७४५ रुपये,  मंगेश पद्माकर कोळी अपक्ष ४१ हजार ६१ रुपये,  पांडुरंग दामोदर चौले अपक्ष ३८ हजार ८६९ रुपये,  नितीन जगन्नाथ मयेकर अपक्ष २५ हजार १५१ रुपये , श्रीनिवास सत्यनारायण मट्टपती अपक्ष ३८ हजार ७१४ रुपये, अनंत पद्मा गिते अपक्ष २५ हजार २०० रुपये , अनंत बाळोजी गिते अपक्ष २५ हजार ९५४ रुपये केले आहेत. त्यामुळे प्रचारावरील खर्चात सुनील तटकरे यांनी सर्वाधिक निधी खर्च केला असून, अनंत गिते यांनीही प्रचारावर मोठा निधी खर्च केला आहे.