News Flash

Ganpati Visarjan 2016: पुढच्या वर्षी लवकर या… राज्यभरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

ढोलताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत राज्यभरात भाविकांनी भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला.

विसर्जनासाठी आकर्षक रोषणाई केलेल्या रथांवरुन बाप्पाची मिरवणूक काढली जात आहे.

अकरा दिवसाच्या पाहुणचारानंतर स्वगृही निघालेल्या बाप्पाला गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला.  गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आणि ढोलताशा पथकांच्या तालावर गणरायाला निरोप दिला जात आहे. राज्यभरात वरूणराजानेही चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईत मधूनच मुसळधार पावसाची सर येत आहे. परंतु याचा कोणताच परिणाम गणेश भक्तांवर होताना दिसत नाही.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कुठे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व प्रशासन सज्ज झाले आहे. भांडूप, मुलूंड, सायन, माटुंगा, दादर, परळ, चेंबूर, कांजूरमार्ग, पवई, विक्रोळी येथे पावसाने हजेरी लावली. डीजे, डॉल्बीबरोबर पारंपारिक वाद्य ढोल, ताशे, झांज, लेझिमची पथके बाप्पाला वाजतगाजत निरोप देत आहेत.
कोल्हापुरातील मानाचा गणपती तुकाराम माळी बाप्पाच्या मिरवणुकीस सकाळी ८.३० वाजता प्रारंभ झाला. यंदा कोल्हापुरात प्रशासनाने दिलेल्या डॉल्बीमुक्त मिरवणुकीला मंडळांनीही चांगला प्रतिसाद दिला. यावेळी मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्याबरोबर लेझर शो, लाईटसचा मोठा वापर होत आहे. तसेच विविध नृत्यांचे सादरीकरण ही केले जात आहे. कोल्हापुरात मिरवणूक मार्गावर २६ सीसीटीव्ही लावले असून पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबीयांसह मुंबई महापौरांच्या निवासस्थानी बनवण्यात आलेल्या कृत्रिम तलावात आपल्या इकोफ्रेंडली बाप्पाचं विसर्जन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेश विसर्जनावेळी नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देत विसर्जन स्थळावर अस्वच्छता न करण्याचे आवाहन केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही लेझिमवर ताल धरला. काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थिती आणि पुण्यातील दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईतील सुमारे ५० हजार पोलिस यावेळी बंदोबस्ताकरिता रस्त्यावर आहेत. तर यंदा प्रमुख चौपाटय़ांवर पोलिसांचे ‘ड्रोन’ कॅमेरे टेहळणीकरिता भिरभरत आहेत. या शिवाय सीसी टीव्हींचीही नजर विसर्जन मिरवणुकांवर आहे. महत्त्वाचे म्हणजे घातपाताची शक्यता लक्षात घेऊन आणि फ्रान्समधील ट्रक हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ट्रक चालकांची संपूर्ण माहिती देखील पोलिसांनी गोळा केली आहे.

दिग्विजय जिरागे September 16, 20168:25 am

कल्याण येथे कोळीवाडा गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करताना. छायाचित्र: दिपक जोशी

दिग्विजय जिरागे September 16, 20168:08 am

पुण्यातील विविध मंडळांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच

दिग्विजय जिरागे September 16, 20168:06 am

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन

रोहित धामणस्कर September 16, 20167:33 am

लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन

रोहित धामणस्कर September 16, 20167:26 am

श्रीमंत दगडुशेठच्या दर्शनासाठी टिळक चौकात भाविकांचा तुफान गर्दी

रोहित धामणस्कर September 16, 20167:25 am

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती टिळक चौकात दाखल

रोहित धामणस्कर September 16, 20167:17 am

पुणे: श्रीमंत दगडुशेठ हलवाई अलका चौकात दाखल

रोहित धामणस्कर September 16, 20167:05 am

कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाचा विशेष तराफा समुद्रात ओढण्यास सुरूवात

रोहित धामणस्कर September 16, 20167:04 am

गिरगाव चौपाटीवरील लालबागच्या राजाची आरती संपली; विशेष तराफ्यावर बसून लालबागच्या राजाची मूर्ती समुद्राच्या दिशेने रवाना

रोहित धामणस्कर September 16, 20166:50 am

रोहित धामणस्कर September 16, 20166:33 am

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

रोहित धामणस्कर September 16, 20166:17 am

पुणे: विसर्जन मिरवणुकीतील डीजे पुन्हा सुरू

रोहित धामणस्कर September 16, 20166:13 am

भाऊ रंगारी मंडळाचा गणपती टिळक चौकात दाखल; थोड्याचवेळात विसर्जन घाटाकडे प्रस्थान

रोहित धामणस्कर September 16, 20166:06 am

लालबागचा राजा गिरगाव परिसरात दाखल; थोड्याचवेळात विसर्जन होणार

रोहित धामणस्कर September 16, 20166:05 am

श्रीमंत दगडुशेठ हलवाई लक्ष्मी रोड चौकात दाखल

रोहित धामणस्कर September 16, 20164:17 am

श्रीमंत दगडुशेठ बेलबाग चौकात दाखल

रोहित धामणस्कर September 16, 20164:16 am

श्रीमंत दगडुशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

रोहित धामणस्कर September 16, 20163:18 am

अखिल मंडई मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकात

रोहित धामणस्कर September 16, 20161:55 am

श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकात दाखल

रोहित धामणस्कर September 16, 20161:26 am


कोल्हापूर: महाद्वारचा गणेशमय माहोल; रात्री सव्वा वाजता भक्तांची अलोट गर्दी

रोहित धामणस्कर September 16, 20161:09 am

नेहरू तरूण मंडळाचा गणपती टिळक चौकातून मार्गस्थ

रोहित धामणस्कर September 16, 20161:08 am

रात्री १२ वाजेपर्यंत केळकर रस्त्यावरून १८ गणेश मंडळांचे प्रस्थान

रोहित धामणस्कर September 16, 20161:07 am

बाबू गेनू मंडळांचा गणपती बेलबाग चौकातून मार्गस्थ

रोहित धामणस्कर September 16, 201612:07 am

पुणे: १२ वाजल्यामुळे पोलिसांकडून डीजे बंद

रोहित धामणस्कर September 16, 201612:02 am

पुण्यात पावसाला सुरूवात

रोहित धामणस्कर September 16, 201612:01 am

जिबल्या मारूती मंडळाचा गणपती बेलबाग चौकात दाखल

रोहित धामणस्कर September 16, 201612:01 am

मुंबई: जी.टी. हॉस्पिटल गणपतीची विसर्जन मिरवणूक

रोहित धामणस्कर September 15, 201611:46 pm

प्रचंड गर्दीमुळे पुण्यातील विसर्जन मिरवणुकांचा खोळंबा; गणपतींचे विसर्जन विलंबाने

रोहित धामणस्कर September 15, 201611:44 pm

विसर्जन मिरवणुकांसाठी टिळक रोडवर प्रचंड गर्दी

रोहित धामणस्कर September 15, 201611:36 pm

पुण्यात गणेश विसर्जनासाठी भक्तांची गर्दी; लक्ष्मी रोड, टिळक रोड, केळकर रोडवर प्रचंड गर्दी

रोहित धामणस्कर September 15, 201611:36 pm

पुण्याच्या लक्ष्मी रोडवरून १३ तासांत २८ गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

रोहित धामणस्कर September 15, 201611:30 pm

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत भाजप नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गोळीबार

रोहित धामणस्कर September 15, 201611:03 pm

लालबागचा राजा नागपाड्यातील दोन टाकी परिसरात दाखल; मुस्लिम बांधव करणार पूजा

रोहित धामणस्कर September 15, 201611:03 pm

मुंबईत सकाळपासून २४,७८६ गणेशमूर्तींचे विसर्जन

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 201610:34 pm
रोहित धामणस्कर September 15, 201610:18 pm


पुण्याच्या गुरूवर्य जगदोबा मंडळाच्या गणपतीची मिरवणूक लक्ष्मी रोडवर दाखल

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 201610:18 pm

गजानन मंडळ आणि गरुड गणपती मंडळांचे गणपती एकाच रथातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाले, गेल्यावर्षीपासून हे दोन्ही मंडळ एकत्र मिरवणूक काढतात.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 201610:15 pm

गजानन मंडळ आणि गरुड गणपती मंडळांचे गणपती एकाच रथातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाले, गेल्यावर्षीपासून हे दोन्ही मंडळ एकत्र मिरवणूक काढतात.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 201610:04 pm

जुहू चौपाटीवर विसर्जनादरम्यान बुडणा-या तिघांना वाचवण्यात यश, जीवरक्षकांनी वाचवले तिघांचे प्राण

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20169:45 pm

गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला गिरगावचा महाराजा

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20169:22 pm

कागदापासून तयार केलेला काळबादेवीचा इको फ्रेंडली गणपती

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20169:20 pm

गणेशभक्तांच्या गर्दीने गजबजून गेलेला दादर चौपाटीच्या दिशेने जाणारा रस्ता

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20169:12 pm

पुण्यातील जिलब्या मारुती गणपती मंडळाचा गणपती, थोड्याच वेळा लक्ष्मी रोडवरुन विसर्जनासाठी मार्गस्थ होणार

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20168:40 pm

गणेश विसर्जनाचा आढावा घेण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेदेखील गिरगाव चौपाटीवर हजर.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20168:36 pm

पुण्यातील टिळक रोडवर दाखल झालेला खजिना मित्र मंडळाचा गणपती

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20168:32 pm

मार्केट यार्ड मंडळाचा गणपती टिळक रोडवर दाखल, मंडळाच्या शारदा गजानन मुर्तीचे विलोभनीय रुप

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20168:05 pm

गणेश विसर्जनादरम्यान डीजेच्या तालावर बेंधूद होऊन नाचणारी तरुणाई

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20167:55 pm

मंगलमुर्ती गणेशोत्सव मंडळ, कामाठीपुरा

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20167:45 pm

आर के स्टुडिओच्या गणेशोत्सवात कपूर कुटुंबीयांची दादागिरी, विसर्जनादरम्यान प्रश्न विचारणा-या पत्रकाराला धक्काबुक्की, रणधीर कपूर यांनी केली धक्काबुक्की, ऋषी कपूर यांनीही सेल्फी घेणा-या चाहत्याला केली धक्काबुक्की

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20167:42 pm

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर गिरगाव चौपाटीवर दाखल.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20167:41 pm

लालबागचा राजा भायखळा स्टेशनजवळ पोहोचला, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची अलोट गर्दी

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20167:32 pm

विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या गणरायाचे विलोभनीय रुप

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20167:24 pm

गिरगाव चौपाटीवरील विसर्जनासाठी भाविकांची गर्दी, सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20167:21 pm

गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी अलोट जनसागर

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20167:09 pm

पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, केसरीवाडा गणपतीचे थोड्यापूर्वीच विसर्जन.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20167:05 pm

मुंबईत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १०, ६१६ घरगुती आणि ४१६ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20166:34 pm

गणेश विसर्जन आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20166:31 pm

मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या गणपतीचे विसर्जन

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20166:27 pm

रात्री नऊ वाजता समुद्रात भरती, भरतीपूर्वी विसर्जन करण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20166:17 pm
विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20165:50 pm

वंदे मातरम क्रीडा मंडळ – 9वा कामाठीपुरा (मध्य)

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20165:47 pm

कोलभाट लेनचा राजा

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20165:45 pm

मुंबईचा राजा – गणेश गल्ली गिरगाव चौपाटीवर दाखल, गणेश गल्लीपाठोपाठ खेतवाडीचेही गणपती थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर पोहोचणार

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20165:42 pm

मिरजमध्ये राज्य सरकारचा निषेध, डॉल्बीला पोलिसांनी विरोध केल्याचा निषेध.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20165:39 pm

अखिल चंदनवाडीची कासवावर स्वार उंच मूर्ती

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20165:22 pm

गिरगाव चौपाटीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती दाखल होण्यास सुरूवात. भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20165:18 pm

गुरूजी तालीम मंडळाचे पथक अलका चौकात

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20165:14 pm

गिरगावचा विघ्नहर्ता

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20165:10 pm

लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डींगजवळ पुष्पवृष्टी

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20164:58 pm

ढोल पथकांमध्ये अंतर, तांबडी जोगेश्वरी आणि गुरूजी तालीम मंडळात मोठे अंतर

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20164:49 pm
पुण्यात तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन
विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20164:41 pm

विसर्जनासाठी वाजत गाजत निघालेला ताडदेवचा राजा

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20164:32 pm


रिमझिम पाऊस आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गिरगावचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20164:26 pm

दिल्लीतही गणेशोत्सवाचा उत्साह, महाराष्ट्र सदनातील गणपती विसर्जनसाठी मार्गस्थ, मिरवणुकीत कोल्हापूरमधील झांज पथक सहभागी, यमुना नदीत होणार गणरायाचे विसर्जन

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20164:19 pm

पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन, सलग दुस-या दिवशी कृत्रिम हौदात विसर्जन

दिग्विजय जिरागे September 15, 20164:14 pm

पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा मंडळाचा गणपती.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20164:12 pm
वर्धा जिल्ह्यातील माणिकवाडा गावात विसर्जनासाठी नदीत गेलेल्या चौघांपैकी तिघे जण बेपत्ता, कडा नदीवरील घटना, तिघांचा शोध सुरु.
विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20164:09 pm

गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…. मुंबईत विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले गणराय

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20164:02 pm

नांदेड जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान एकाचा मृत्यू, कुंडलवाडी नगरपरिषदेचे कर्मचारी विजय वाघमारे यांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू, विसर्जनासाठी जाताना पाय घसरुन पडले होते नदीत.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20163:41 pm

ग्रँटरोडमधील मनिष बिल्डींग येथील २१ मुखी गणेश विसर्जनासाठी मार्गस्थ

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20163:33 pm

कृत्रिम तलावातच गणरायाचे विसर्जन करा, अमृता फडणवीस यांचे गणेशभक्तांना आवाहन

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20163:28 pm

खेतवाडीचा महागणपती, ८ वी गल्ली बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

दिग्विजय जिरागे September 15, 20163:28 pm

श्रॉफ बिल्डिंगजवळ तेजुकाय गणपतीवर पुष्पवृष्टी.

दिग्विजय जिरागे September 15, 20163:26 pm

खेतवाडीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ.

विश्वास पुरोहित पुरोहित September 15, 20163:24 pm

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचे महापौर बंगल्यावर विसर्जन, विसर्जनादरम्यान महापौरांचीही उपस्थिती.

दिग्विजय जिरागे September 15, 20163:23 pm

खेतवाडी ७ वी गल्ली गणेशोत्सव मंडळ, मुंबई

दिग्विजय जिरागे September 15, 20163:19 pm

पुण्याच्या बेलबाग चौकात मुस्लिम बांधवांकडून मानाच्या कसबा गणपतीचे स्वागत.

दिग्विजय जिरागे September 15, 20163:14 pm

गुलाल, फुलं उधळत मिरवणुका सुरू.

दिग्विजय जिरागे September 15, 20163:07 pm

पुण्यातील हत्ती गणेश मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक बैलगाडीवरून काढण्यात येत आहे.

दिग्विजय जिरागे September 15, 20163:00 pm
दिग्विजय जिरागे September 15, 20162:58 pm

बालगोपाळ मित्र मंडळ, खेतवाडी, मुंबई

दिग्विजय जिरागे September 15, 20162:43 pm

खेतवाडी ११ वी गल्ली, ग्रँटरोड गणेश मुर्ती

दिग्विजय जिरागे September 15, 20162:39 pm

संगमनेरमध्ये मानाच्या सोमेश्वर मंडळाच्या गणेशाचे प्रस्थान.

दिग्विजय जिरागे September 15, 20162:38 pm

नंदूरबार मिरवणुकीत पारंपारिक गोफ नृत्य करत बाप्पांना निरोप.

दिग्विजय जिरागे September 15, 20162:25 pm

खेतवाडीचा गणराज, १२ वी गल्ली. गणपतीची महाआरती.

दिग्विजय जिरागे September 15, 20162:24 pm

पुण्याचा मानाचा कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक अलका चौकात दाखल.

दिग्विजय जिरागे September 15, 20162:17 pm

पुण्याचा मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

दिग्विजय जिरागे September 15, 20162:12 pm

मुंबई येथील राजा तेजुकायाचा गणपती मिरवणुकीत पावसातही मोठ्यासंख्येने भाविक उपस्थित आहेत.

दिग्विजय जिरागे September 15, 20161:55 pm
दिग्विजय जिरागे September 15, 20161:54 pm
दिग्विजय जिरागे September 15, 20161:53 pm

औरंगाबादेत मानाच्या संस्थान गणपतीच्या विधिवत पुजेनंतर मिरवणुकीस प्रारंभ

दिग्विजय जिरागे September 15, 20161:52 pm

नागपूरच्या राजाची मिरवणूक उत्साहात मार्गस्थ.

दिग्विजय जिरागे September 15, 20161:22 pm

कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील.

दिग्विजय जिरागे September 15, 20161:17 pm

ओम तांडव गणेशोत्सव मंडळ, खेतवाडी १० वी गल्ली. लालबागच्या राजाची प्रतिकृती.

दिग्विजय जिरागे September 15, 20161:07 pm

मुंबई येथील चिंचपोकळी गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक.

दिग्विजय जिरागे September 15, 20161:02 pm
दिग्विजय जिरागे September 15, 201612:52 pm

पुण्याचा मानाचा तिसरा गुरूजी तालीम गणपतीचा मोबाईलवर फोटो काढताना भाविक.

दिग्विजय जिरागे September 15, 201612:40 pm
दिग्विजय जिरागे September 15, 201612:16 pm

लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा – गणेश गल्ली च्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी लोटला जनसागर.

दिग्विजय जिरागे September 15, 201612:09 pm

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू, तरीसुद्धा भाविकांचा उत्साह कमी नाही

दिग्विजय जिरागे September 15, 201611:57 am

पुण्यातील बेलबाग चौकात मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचे आगमन.

दिग्विजय जिरागे September 15, 201611:50 am

ढोल ताशांच्या गजरात कसबा गणपतीची मिरवणूक सुरू.

दिग्विजय जिरागे September 15, 201611:26 am

पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीस सुरूवात.

दिग्विजय जिरागे September 15, 201611:11 am

लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू. हजारो भाविकांची उपस्थिती.

दिग्विजय जिरागे September 15, 201610:39 am

पुण्यात पावसातही घरगुती गणेशाचे विसर्जन सुरू.

दिग्विजय जिरागे September 15, 201610:37 am

औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ.

दिग्विजय जिरागे September 15, 201610:06 am

लालबाग परिसरात पावसाला प्रारंभ

दिग्विजय जिरागे September 15, 20169:58 am

मुंबईत लालबाग परिसरात एसआरपीएफ, पोलीस तैनात

दिग्विजय जिरागे September 15, 20169:55 am

विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही, ड्रोनची नजर

दिग्विजय जिरागे September 15, 20169:45 am

मुंबई पोलीस बंदोबस्त व स्थळदर्शक फलक.

दिग्विजय जिरागे September 15, 20169:37 am

मुंबईत एकूण १०० विसर्जनाची ठिकाणे. ३१ ठिकाणी कृत्रिम तलावांची महापालिकेतर्फे सोय

दिग्विजय जिरागे September 15, 20169:05 am

मुंबईतील गणेश गल्ली राजाचे भारतमाताच्या दिशेने प्रस्थान

दिग्विजय जिरागे September 15, 20168:28 am

ढोल- ताशांच्या गजरात मुंबईतील गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ.

दिग्विजय जिरागे September 15, 20168:27 am

भांडूप, मुलूंड, सायन, माटुंगा, दादर, परळ, चेंबूर, कांजूरमार्ग, पवई, विक्रोळी येथे वरूणराजाची हजेरी.

दिग्विजय जिरागे September 15, 20168:23 am

मुंबई शहर परिसरात पावसाची हजेरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 8:13 am

Web Title: live updates blog for ganpati visarjan sohala 2016 from mumbai pune maharashtra
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना शनिवारपासून ताडोबाची नि:शुल्क शैक्षणिक सहल घडणार
2 विनोद तावडेंच्या ‘त्या’ बठकीला नुटा व ‘एसीयुएसएटी’ला निमंत्रणच नव्हते
3 सोलापुरात ‘उत्तरा’च्या पावसाने दिलासा
Just Now!
X