News Flash

झाडाची फांदी पडून पर्यटक महिलेचा मृत्यू

दुचाकीवरून जात असताना झाडाची फांदी किरण माने यांच्या डोक्यात पडली.

पुण्याहून स्वप्निल माने हे आपली पत्नी किरण यांच्यासह दोन दिवसापूर्वी पर्यटनासाठी दुचाकीवरून पाचगणी महाबळेश्वर येथे आले होते. सायंकाळच्या सुमारास महाबळेश्वर येथून परतत असताना किरण यांच्या डोक्यावर झाडाची फांडी पडून त्यांचा मृत्यू झाला. अभिनेता अमिर खान यांच्या घरासमोरून जात असताना हा प्रकार घडला.

महाबळेश्वर येथून माने दांपत्य परतत असताना झाडाची कुजलेली फांदी किरण माने यांच्या डोक्यात पडली. त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्यावर घसरली. यामध्ये किरण माने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती स्वप्नील यांनी हेल्मेट घातलेले असल्यामुळे ते बचावले. परंतु त्यांनाही दुखापत झाली आहे. दरम्यान, रक्‍तबंबाळ अवस्थेत किरण माने यांना पाचगणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पाचगणी पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील उंच झाडावरील कुजलेल्या व वाहतुकीला अडथळा करणाऱ्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडणे गरजेचे होते. परंतु फांद्या न तोडल्यामुळे कुजलेली फांदी पडून महिलेचा मृत्यू झाला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद पाचगणी पोलिसांत करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 11:56 am

Web Title: mahabaleshwar tourist lady dead fall of tree branch two wheeler jud 87
Next Stories
1 Malegaon Bomb Blast Case: चार आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर
2 राज्यातील मार्डचे डॉक्टर संपावर, कोलकाता येथील डॉक्टरच्या मारहाणीचा निषेध
3 धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Just Now!
X