राज्यातील करोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही आता ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. याशिवाय करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. राज्यात काल(शुक्रवार) ८ हजार ३३३ नवे करोनाबाधित आढळल्यानंतर, आजदेखील ८ हजार ६२३ नव्या करोनाबाधितांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच, काल राज्यात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता तर आज मृत्युंची संख्या ५१ आहे. यावरून करोना संसर्गाचे प्रमाण आपल्या लक्षात येते. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ टक्के असुन, आजपर्यंत ५२ हजार ९२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
याशिवाय आज दिवसभरात राज्यात ३ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत २० लाख २० हजार ९५१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९४.१४ टक्के एवढे झाले आहे.
Maharashtra reported 8,623 new COVID-19 cases, 3,648 recoveries, and 51 deaths in the last 24 hours, as per State Health Department
Total cases: 21,46,777
Total recoveries: 20,20,951
Death toll: 52,092
Active cases: 72,530 pic.twitter.com/ucva3a4QDD— ANI (@ANI) February 27, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,९९,८१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ४६ हजार ७७७ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३४ हजार १०२ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ३ हजार ८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ७२ हजार ५३० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आता खासगी रुग्णालयातही मिळणार करोनाची लस! किंमत ठरली, लवकरच घोषणा होण्याची शक्यता!
भारतात सीरम इन्स्टिट्युटची Covishield आणि भारत बायोटेकची Covaxin या दोन करोना लशींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे देशभरात सरकारतर्फे मोफत या लशींचं लसीकरण केलं जात आहे. सध्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही लस देशातील वेगवेगळ्या वर्गांना दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता खासगी रुग्णालयांमध्ये देखील करोनाची लस मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खासगी रुग्णालयात गेल्यास पैसे देऊन ही लस घ्यावी लागणार आहे. त्यासाठीचे दर देखील सरकारने निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 27, 2021 8:03 pm