03 March 2021

News Flash

भांडणात समजूत घातल्यावरून भावाची हत्या

शेजाऱ्याशी झालेल्या भांडणात समजूत घालण्यास गेलेल्या भावाची सख्ख्या भावानेच हत्या केल्याची घटना तालुक्यातील आघार बुद्रुक शिवारात घडली.

| June 7, 2015 05:45 am

शेजाऱ्याशी झालेल्या भांडणात समजूत घालण्यास गेलेल्या भावाची सख्ख्या भावानेच हत्या केल्याची घटना तालुक्यातील आघार बुद्रुक शिवारात घडली. या प्रकरणी खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. दीपक दगा अहिरे (४५) असे हत्या झालेल्या भावाचे नाव आहे. त्याचा भाऊ देवेंद्रच्या शेतालगत अनिल निकम यांचे शेत आहे. शुक्रवारी निकम यांनी आपल्या शेताभोवती कुंपणाचे काम सुरू केले असता देवेंद्रने मजुरांना शिवीगाळ सुरू केली. त्या वेळी दीपक यांनी त्याला समजावत शिवीगाळ करू नको असा सल्ला दिला. त्याचा राग आल्याने भावाबरोबरच त्याने भांडण उकरून मारहाण सुरू केली. या वेळी भावाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी दीपक यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता देवेंद्रने नाजूक भागावर मारहाण केली. त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या दीपक यांना सामान्य रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांची पत्नी शोभा अहिरे यांनी या संदर्भात तक्रार दिल्यावर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून देवेंद्रला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने संशयिताची तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 5:45 am

Web Title: man kills brother
Next Stories
1 शेताचा ताबा घेणाऱ्यांसमोरच शेतकऱ्याची आत्महत्या
2 राज्य वन्यजीव मंडळाच्या नव्या कार्यकारिणीत तज्ज्ञांना डच्चू
3 ‘अजित पवारांना हजर व्हावे लागेल’
Just Now!
X