03 April 2020

News Flash

मेहरुन्निसा दलवाई काळाच्या पडद्याआड

मुस्लिम समाजाला वेगळी दिशा देणाऱ्या कार्यकर्त्या हरपल्या

समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचे आज पुण्यातल्या निवासस्थानी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. मेहरुन्निसा यांचे पार्थिव हडपसरच्या साने गुरुजी रूग्णालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात येणार आहे.

मेहरुन्निसा यांचा जन्म २५ मे १९३० रोजी पुण्यात झाला होता. हमीद दलवाई यांच्यासोबत मेहरुन्निसा यांचा विवाह १९५६ मध्ये झाला होता. आधी हा विवाह इस्लामिक पद्धतीने करण्यात आला. त्यानंतर विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नोंदणी विवाहही या दोघांनी केला होता. उर्दू भाषिक मेहरुन्निसा यांनी अल्पावधीतच मराठी भाषा अवगत केली. दलवाई दाम्पत्याला रुबिना आणि ईला अशा दोन मुली झाल्या. या दोन्ही मुलींनी आंतरधर्मिय विवाह केला. हमीद दलवाई यांच्या निधनानंतर मेहरुन्निसा यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात अधिक सक्रिय होऊन काम केले. तसेच या मंडळाचे अध्यक्ष म्हणून समर्थपणे काम पाहिले. १९८६-८७ मध्ये त्यांनी तलाक मुक्ती मोर्चाही काढला होता. ‘मी भरून पावले’ हे त्यांचे आत्मचरित्र लोकप्रिय झाले. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2017 4:00 pm

Web Title: mehrunnisa dalwai no more
Next Stories
1 मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, शेतकऱ्याची चिठ्ठी
2 शेतकरी संप, खानावळ आणि शेतकऱ्याची मुलं
3 ‘नमामी चंद्रभागा’अभियान वर्षभरानंतरही कागदावरच!
Just Now!
X