News Flash

मुख्यमंत्र्यांनी घोटली सत्तेची ठंडाई, शिवसेनेला युतीची नशा-राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना आणि भाजपाच्या युतीवर राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून निशाणा

संग्रहित छायाचित्र

आज धुळवड असल्याने राजकीय पक्षांची एकमेकांवर टीका करणं सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्यंगचित्र ट्विट करून भाजपावर टोलेबाजी केली आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठंडाई घोटताना दाखवण्यात आलं आहे. ठंडाई घ्या ठंडाई असे ते ओरडत आहेत. तर त्यांच्या बाजूला एका बाकावर उद्धव ठाकरे बसलेले आहेत असे दाखवण्यात आले आहे. देवेंद्रभाई माझे मोठे भाऊ.. नाही नाही.. नरेंद्रभाई माझे छोटे भाऊ.. माझा भाऊ.. भाई.. असे म्हणताना उद्धव ठाकरे दाखवण्यात आले आहेत.

शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी युती केली ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने धुळवडीच्या निमित्ताने टीका केली आहे. शिवसेनेचे बदलते रंग या नावाने फोटो ट्विट करूनही राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. बुरा न मानो होली है असंही प्रत्येक ट्विटच्या माध्यमातून लिहिण्यात आली आहे.

आता या टीकेला भाजपाकडून कसे उत्तर दिले जाणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात ट्विटरवरून कायमच अशा प्रकारची व्यंगचित्रं पोस्ट करण्यात येतात. आता या व्यंगचित्राला भाजपा कसं उत्तर देणार हे स्पष्ट होईलच. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता असे आरोप प्रत्यारोप पहाण्यास मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 6:43 pm

Web Title: ncp post cartoon on twitter against bjp and shivsena
Next Stories
1 प्रतीक पाटील म्हणतात मी भाजपाच्या वाटेवर नाही
2 धनंजय मुंडे म्हणतात, रंग बदलने वालोंको भी होली की शुभकामनाएं
3 रामटेक, चंद्रपूरमध्ये काँग्रेसतर्फे नवीन चेहऱ्याला संधी
Just Now!
X