रंकाळा तलावातील पाण्याच्या दरुगधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने शिवसनिकांनी शनिवारी रंकाळ्यातील ड्रेनेजमधील मलामिश्रित पाणी महापालिकेसमोर ओतून निषेध नोंदवला. हिरवेगर्द पाणी महापालिकेसमोर ओतल्याने परिसरात दरुगधी पसरली होती.
शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाची महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे दुरवस्था झाली आहे. ब्ल्यू ग्रीन-अलगी या वनस्पतीमुळे तलावातील पाण्यास हिरवट रंग आला आहे. ड्रेनेजचे पाणी तलावात मिसळत असल्याने पाण्याला दरुगधी सुटली आहे. दरुगधीची तीव्रता इतकी आहे, की त्यामुळे परिसरातील नागरिक दारे-खिडक्या बंद करीत आहेत. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकात पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शिवसैनिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसनिकांनी रंकाळा तलावातील दरुगधीयुक्त हिरवट पाणी महापालिकेसमोर ओतले. या पाण्यापासून निषेध असे मोठे लिहिण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सहायक आयुक्त नितीन देसाई यांना निवेदन देण्यात आले. दोन दिवसांत दरुगधी नष्ट न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.