News Flash

शिर्डीत वाळुतस्करांचा कोतवालावर प्राणघातक हल्ला

राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोशीत गळफास घेऊन महिलेनं जीवनयात्रा संपवली.

शिर्डीमध्ये वाळुतस्करांनी कोतवालावर प्राणघातक हल्ला केला आहे. कोल्हार भगवती गावात मंगळवारी ही घटना घडली आहे. या मारहाणीत कोतवाल गंभीर जखमी झाला आहे.
शिर्डीजवळच्या कोल्हार भगवती गावात वाळूतस्करांनी कोतवाल राजेंद्र गायकवाड यांना बेदम मारहाण केली आहे. वाळुची गाडी पकडल्याच्या रागातून ही मारहाण झाली. कोतवालासह आणखी एका व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आरोपी अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 11:10 pm

Web Title: sand smuggler attack on kotwal in shirdi
Next Stories
1 ‘मोदी फर्माना’मुळे सामान्यांना जीवन जगणे असह्य- नवाब मलिक
2 नोटबंदी: आधी परीक्षा फॉर्म भरा, नंतर पैसे द्या!; १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना सरकारचा दिलासा
3 रोख स्वीकारण्यावर बंदी घातल्याने जिल्हा बँकांचे संचालक न्यायालयात जाणार
Just Now!
X