News Flash

संजय राऊतांनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट; सांगितलं काय झाली चर्चा!

सध्या महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये विविध मुद्य्यांवरून मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यात सध्या महाविकासआघाडी सरकारमधील अंतर्गत कलहाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.(संग्रहीत छायाचित्र)

सध्या राज्यात विविध मुद्य्यांवरून महाविकासआघाडी मधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये काहीसे मतभेद निर्माण होताना दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेसंदर्भातही चर्चांणा उधाण आलेले आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे नव्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपाकडून मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षणासह अन्य प्रमुख मुद्यांवरून आक्रमक भूमिका घेत, सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन, त्यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली.

”शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे पवार म्हणाले.” असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकमेकांशी समन्वय साधत काम करत आहेत. सत्ता गेल्याने ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्षे चालणार. महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न के ला तरी यश मिळणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या अगोदर म्हटलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 9:15 pm

Web Title: sanjay raut meets sharad pawar in delhi msr 87
Next Stories
1 Coronavirus : राज्याचा रिकव्हरी रेट ९५.९३ टक्क्यांवर ; दिवसभरात ११ हजार ३२ रूग्ण करोनामुक्त
2 ताडोबा बफर झोनमधील पळसगावात वाघिणीचा धुमाकूळ; ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण!
3 आपण अधिवेशनही दोन दिवसांचं ठेवलं असताना निवडणुका कशा घेऊ शकतो – छगन भुजबळ
Just Now!
X