ज्येष्ठ हिंदी कवी हरिनारायण व्यास (वय ९०) यांचे पुण्यात सोमवारी अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे व दोन मुली आहेत.
हिंदी भाषेतील ते एक महत्त्वाचे कवी समजले जात. त्यांचे सात कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘मृग और तृष्णा’, ‘त्रिकोणपर सूर्योदय’, ‘बरगद के चिकने पत्ते’, ‘आऊटर पर रूकी ट्रेन’, ‘निद्रा के अनंत मे जागते हुए’ या त्यांच्या कवितासंग्रहांना रसिकांचा विशेष प्रतिसाद लाभला.
व्यास उज्जनच्या प्रेमचंद सृजन पीठाचे निर्देशक होते. भोपाळमधील भारत भवनाच्या ‘वागार्थ’ या उपक्रमाचे ते संयोजक होते. मध्य प्रदेश साहित्य संघाचे ‘भवभूती पारितोषिक’, ‘शिखर पारितोषिक’ तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या ‘अनंत गोपाल शेवडे पारितोषिका’चे ते मानकरी होते.