लातूर- निलंगा मार्गावर एसटीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ३१ प्रवासी जखमी झाले असून अपघातातील जखमींवर लातूर आणि औसा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एसटी महामंडळाची एम एच २० डी ९६११ ही बस शनिवारी लातूरहून निलंग्याला जाण्यासाठी निघाली. दुपारी तीनच्या सुमारास बस लातूर- निलंगा मार्गावरील चलबुर्गा या गावाजवळ पोहोचली. या दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात ६ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ३१ प्रवासी या अपघातात जखमी झाली असून यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.  या अपघातात बसचालक आणि वाहक जखमी झाले असून ट्रकचालकाने अपघातानंतर पळ काढला आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
mumbai airport, five crore passengers mumbai airport
मुंबई विमानतळावरून ५ कोटी प्रवाशांचा प्रवास
mumbai best bus marathi news, mumbai long queues of passengers marathi news
अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका
accident in Uran, Two died accident uran
उरणमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू