अनगर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीने गावातील एका मुलाकडून होत असलेल्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी पहाटे पाचच्या सुमारास घटली असून आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आलिशा चाँद शेख असे आहे. या प्रकरणी महेश जाधव या संशयिताविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महेश हा आलिशाची छेड काढत होता. या त्रासाला आलिशा कंटाळली होती. त्यामुळे तिने गुरूवारी पहाटे स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु तिचा मृत्यू झाला होता. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.