संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील संदीप जोशी यांनी भास्कर जोशी याला पाच वर्षांसाठी गहाण खतापोटी एक एकर शेतजमीन कसण्यासाठी दिली होती. तर त्याबदल्यात घेतलेले पैसे देऊ नही शेतजमीन परत मिळत नव्हती. त्यामुळे संदीप  यांचे वडील गंगाधर भिकाजी जोशी यांनी आरोपी भास्कर जोशी याच्यासमोरच विषारी औषध पिऊ न आत्महत्या केली. आश्वी पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप जोशी यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, मी दाढ खुर्द येथे कु टुंबासमवेत राहत असून दाढ खुर्द शिवारात गट नं ६६ मधील एक एकर शेतजमीन २००३ मध्ये भास्कर भीमा जोशी (रा. दाढ खुर्द) याच्याकडे गहाण खतापोटी देऊ न १ लाख व व्याजाने दीड लाख असे एकू ण अडीच लाख रुपये घेतले होते. २०१६ मध्ये भास्कर जोशी याला तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब जोशी, सुरेश जोरी व अशोक जोरी यांच्यासमक्ष व्याजासह ४ लाख ४० हजार रुपये दिले. परंतु त्याने आमची शेतजमीन परत न दिल्याने आमच्यात वाद सुरु होता. यातून माझे वडील गंगाधर जोशी यांना नेहमी धमक्या व मानसिक त्रास तो देत असे.

मंगळवारी (१६ जुलै) माझे वडील गावातील चौकात बसलेले असताना भास्कर जोशी यांने तुझी जमीन सोडणार नाही म्हणत शिवीगाळ केली. वडील आत्महत्या करेन, असे म्हणताच, तू आत्महत्या काय करतो मीच तुला मारुन टाकेन, असे भास्कर जोशी म्हणाला. त्यामुळे वडिलांनी त्याच्यासमोरच विषारी औषध प्राशन केले.  गंगाधर  जोशी यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना बुधवार १७ जुलै रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.