News Flash

ताडोबातील व्याघ्रवैभव आता जगाच्या नकाशावर

टपाल तिकिटाचे शुक्रवारी प्रकाशन

ताडोबातील व्याघ्रवैभव आता जगाच्या नकाशावर
भोपाळ येथील वनविहार राष्ट्रीय उद्यानातून ७ एप्रिल २००६ मध्ये तीन वर्षांच्या पलाशला बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले होते. 

टपाल तिकिटाचे शुक्रवारी प्रकाशन

जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या डाक विभागाने घेतला असून हे व्याघ्रवैभव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. येत्या २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे.

ताडोबाच्या जंगलातील एक वाघीण आपल्या बछडय़ावर प्रेम करत असतानाचे हे छायाचित्र चंद्रपूरच्या अमोल बैस या तरुण हौशी वन्यजीव छायाचित्रकाराने  टिपले आहे. या छायाचित्रातून प्रगट होणारे ममत्व लक्षात घेऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या छायाचित्राचे टपाल तिकीट प्रकाशित व्हावे व ताडोबाचे व्याघ्रवैभव जगाच्या नकाशावर अधोरेखित व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला. यासाठी त्यांनी केंद्रीय संचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली.

या छायाचित्रासह ताडोबा अभयारण्याचे महत्व व तेथील व्याघ्रवैभवाचा सविस्तर तपशील त्यांनी केंद्रीय संचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना सादर केला.

या मागणीचा पाठपुरावा करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून केंद्र सरकारने ते प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असून, जागतिक व्याघ्रदिनी २९ जुलैला रोजी हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2016 1:47 am

Web Title: tadoba andhari tiger project tiger on world map
Next Stories
1 विद्यार्थ्यांच्या छळाच्या १६ घटनांची नोंद
2 रायगड जिल्ह्य़ात ३३ हजार २८३ मच्छीमारांना बायोमेट्रिक कार्डचे वितरण
3 कोकणात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार
Just Now!
X