News Flash

“विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड १९’ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई करा”

कृषीमंत्री दादा भुसे यांचे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला निर्देश

संग्रहीत छायाचित्र

कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.

यासंदर्भात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात कृषी मंत्र्यांनी म्हटले आहे की, कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 4:56 pm

Web Title: take action against those mentioning covid 19 on students marks sheet msr 87
Next Stories
1 औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८ हजार ८८२ वर
2 गडचिरोली : ‘एसआरपीएफ’च्या २९ जवानांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
3 कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई व ठाण्यातही जोरदार पाऊस पडणार!
Just Now!
X