News Flash

न लढताच मोहिते-पाटील पिता-पुत्रांना मिळाणार मंत्रीपदे, भाजपाचे आश्वासन

विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना निवडणूक न लढवताच भाजपच्या मंत्रिमंडळात केंद्रात मंत्री होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना माढ्याच्या उमेदवारीत डावलल्याने त्यांच्या समर्थकांत मोठी नाराजी होती. चंद्रकांत दादा पाटील यांनी अकलूज येथील भाजपा उमेदवाराच्या मेळाव्यात मोहिते पिता-पुत्रांना देशाच्या आणि राज्याच्या सत्तेत सहभागी करून घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे निवडणूक न लढवता मोहिते पाटील पिता-पुत्रांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे.

विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण विजयसिंह मोहिते पाटील यांनी अजून भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, मात्र रविवारी करमाळ्यात भाजपाने आयोजित केलेल्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यासपीठावर हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विजयसिंह मोहिते- पाटील व त्यांच्या चिरंजीवांना भाजपमध्ये आल्याचे दुःख होणार नाही, असे जाहीर आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

यावेळी भाषण करताना रणजितदादांना भाजपमध्ये पाठवण्याच्या निर्णयाचा विजयदादांना पश्चात्ताप होणार नाही. कारण केंद्राच्या सरकारमध्ये विजयदादांचा आणि राज्याच्या सरकारमध्ये रणजितदादांचा समावेश असेल. दिलेला शब्द पूर्ण करण्याची आमची नियत आणि ताकदही आहे. दोन्ही मोहिते-पाटलांचा आम्ही उचित सन्मान करणार असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 3:17 pm

Web Title: vijay dada mohite patil and son will be in the power bjp central government
Next Stories
1 …म्हणून पार्थ पवारांना पाहताच निघून गेले अजित पवार
2 LOC वर पाकिस्तानच्या गोळीबारात लहान मुलीचा मृत्यू, नऊ जखमी
3 VIDEO: मोदींच्या वर्ध्यामधील सभेला अर्ध मैदान रिकामं
Just Now!
X