28 September 2020

News Flash

करोनासोबत जगणं प्रत्येकाने शिकलंच पाहिजे- उद्धव ठाकरे

करोनासोबत जगणं हे अपरिहार्य आहे

फाइल फोटो

करोनासोबत जगणं प्रत्येकानेच शिकलं पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. जनतेला मार्गदर्शन करताना करोनासोबत जगायला तुम्हीच शिकलेला आहात का? असा प्रश्न सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सामनाच्या विशेष मुलाखतीत विचारला. त्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं. फेसबुकच्या माध्यमातून जनतेला मार्गदर्शन मी यापुढेही करणारच आहे असंही मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत सांगितलं.

आणखी वाचा- होय.. डॉक्टर व्हावं असं वाटलं होतं- उद्धव ठाकरे

“करोनासोबत जगणं हे जोपर्यंत आपण शिकत नाही आणि स्वीकारत नाही त्याप्रमाणे वागायला लागत नाही. करोनासोबत जगणं अपरिहार्य आहे हे स्वीकारत नाही तोपर्यंत मी जनतेला मार्गदर्शन करणार. गर्दी टाळणं, विशिष्ट अंतर पाळणं हे महत्त्वाचंच आहे. उगाच फिरणं हे सगळं टाळावं लागलंच पाहिजेच. ” असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- ‘राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा पुन्हा लॉकडाउन का करावं लागत आहे?’; मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

आणखी वाचा- “हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होत आहेत”

काही दिवसांमध्येच फेसबुक लाइव्ह करुन आपण पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितलं. माझ्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही अशावेळी पडली आहे की ज्यावेळी जागतिक आरोग्य आणीबाणीला आपण सामोरे जात आहोत. त्यामुळे करोनासोबत जगणं हे शिकण्याची प्रत्येकाला गरज आहे. अनावश्यक गर्दी टाळणं, उगाच फिरणं या गोष्टी टाळायला हव्यात. त्यासाठी माझ्या परिने जनतेला जे काही मार्गदर्शन आहे ते मी करत राहणार. महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्या विश्वासाचं बळ माझ्या पाठिशी आहे त्यामुळे माझं जनता नक्की ऐकेल असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 9:18 am

Web Title: we have to live with corona says cm uddhav thackeray scj 81
टॅग Uddhav Thackeray
Next Stories
1 उद्धव ठाकरेंनी सांगितलं करोना काळामध्ये मंत्रालयात न जाण्याचं कारण, म्हणाले…
2 सातारा : वाई पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू
3 होय.. डॉक्टर व्हावं असं वाटलं होतं- उद्धव ठाकरे
Just Now!
X