02 March 2021

News Flash

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बंदोबस्तासाठी गेलेल्या महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू

बंदोबस्तासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस शिपाई आरती साबळे या सकाळीच अक्कलकोटला गेल्या होत्या.

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या प्रचारासाठी अक्कलकोट येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात बंदोबस्तासाठी गेलेल्या महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू झाला. सोलापूरकडे परत येताना वाटेत घडलेल्या वाहन अपघातात महिला पोलीस शिपायाचा मृत्यू झाला असून बुधवारी दुपारी हा अपघात झाला.

आरती दीपक साबळे (वय २६) असे मृत महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावर कोन्हाळी येथे हा अपघात झाला. मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रचारासाठी अक्कलकोट येथे आले होते. तेथे त्यांची जाहीर सभा होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस शिपाई आरती साबळे या सकाळीच अक्कलकोटला गेल्या होत्या. बंदोबस्त संपल्यानंतर तेथून आपल्या दुचाकीवरून साबळे सोलापूरकडे परत निघाल्या होत्या. परंतु अक्कलकोटपासून काही अंतरावर कोन्हाळी येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात साबळे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्या. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 1:49 am

Web Title: woman police constable dies in road accident at solapur returning from cm visit
Next Stories
1 एका महिन्यात विरोधी पक्षांच्या १० नेत्यांवर छापे
2 एलईडी मासेमारी बंद न केल्यास परवाने रद्द   
3 ‘टीईटी’ अनुत्तीर्ण शिक्षकांची अद्याप सेवा समाप्ती नाही
Just Now!
X