महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात निर्णय झाला तर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार अशी माहिती आता समोर आली आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात अहमद पटेल आणि कपिल सिब्बल यांच्याशीही चर्चा केली. महाराष्ट्रात सत्था स्थापनेचा अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेने जो दावा केला होता त्याची मुदत संपली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी बोलवण्यात आलं आहे. राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा सिद्ध करता आला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते. असं झाल्यास उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार हे स्पष्ट झालं आहे.  भाजपाला सत्तास्थापनेचा दावा सिद्ध करण्यासाठी ४८ तास आणि शिवसेनेला २४ तास कसे काय? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहेच. अशात आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातली शिफारसच राज्यपालांनी केली आहे. त्यामुळे पुरेसा वेळ सत्तास्थापनेसाठी मिळाला नाही असं सांगत शिवसेना कोर्टात जाणार आहे.