मुजीब काझी 

– परंडा विधानसभा निवडणुकीसाठी भुम-परंडा-वाशी शहरासह तिन्ही तालुक्यातील राजकारण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ढवळून निघत आहे. याच पार्शवभुमीवर आघाडीचे राहुल माटे , युतीचे तानाजी सावंत तर शिवसेनेतून बंडखोरी करत वंचितकडून सुरेश कांबळे यांची लढत होत आहे. या तीन मातब्बराकडून एकमेकांच्या गटाची व पक्षातील कार्यकर्त्यांची फोडाफोडी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत .

कितीही छोटा राजकिय कार्यक्रम असला तरीही त्यामध्ये कार्यकर्त्याच्या पक्षप्रवेशाचा उत्सव परंडा विधानसभा मतदारसंघात पार पडताना दिसत आहे . या मतदारसंघात सलग तीनदा निवडुन येवुन राहुल मोटे यांनी हॅट्रीक साधली आहे . आता त्यांच्यासमोर युतीचे बलाढय उमेदवार तानाजी सावंत तर सेनेतुन बंडखोरी करीत ऐनवेळी बहुजन वंचित आघाडीकडुन सुरेश कांबळे हे निवडणुक रिगणात उतरल्याने या निवडणुकीत रंगत वाढली आहे . पहिल्यांदा आमनेसामने आलेले आमदार राहुल मोटे आमदार तानाजी सावंत हे दोन महत्वाकांक्षी नेते यावेळी विधानसभा निडणुकीच्या निमीत्ताने पाहिल्यांदा एकमेकना भिडणार आहेत .

केंद्रात व राज्यात असलेल्या पक्षाचे उमेदवार या निवडणुकीत पुर्ण ताकदीने उतरले आहेत . त्यांनी परंडा भुम वाशी तालुक्यातील कॉंग्रेसचे बड्या नेत्यांना मातोश्री वर नेऊन सेनेत प्रवेश दिला .परंतु नेत्यांनी काँग्रेसकडुन जिल्हाध्यक्ष . जिल्हा परिषदेत सभापती . नगराध्यक्ष आशी मोठमोठी पदे मिळाली . सेनेत प्रवेश घेतल्याने त्यांना पदे मिळणार का ? कार्यकर्ते म्हणुन राहणार किंवा दुसरकांही मिळणार ? आशी चर्चा या मतदारसंघात रंगु लागली आहे .

राष्ट्रवादी-सेनेची पारंपरिक लढत
परंडा विधानसभेचे आजपर्यतचे राजकारण पाहिले तर परंपरेप्रमाणे राष्ट्रवादी – शिवसेना या दोन पक्षांमध्ये खरी लढत सुरु आहे . राष्ट्रवादीचे मोटे व शिवसेनचे सावंत यांनी एकमेकांच्या गटांना कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे साधा कार्यकर्ता असला तरी त्याला महत्वाचा कार्यकर्ता समजुन फोडाफोडी केली जात आहे. त्याचा कोणत्या तरी कार्यक्रमात पक्षाचे चिन्हाचे गळ्यात कापडी पटटया घालुन पक्षप्रवेश व सत्कार सुरु आहे . आशा पक्षप्रवेशांचे फोटो काढुन सोशल मीडीयावर सोडले जात आहेत .विधानसभेची ही निवडणुक जिंकायची कशी ? याची व्यूहरचना राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित आघाडीचे नेते करीत आहेत . मात्र शिवसेना पक्षाले उमेदवार हे झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच ही देखील निवडणुक होणार आहे, अशा भावनेत आहेत .