Premium

सांगली : लांडग्यांच्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार, २० गायब

कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळांच्या मेंढ्याच्या कळपावर मंगळवारी मध्यरात्री लांडग्यांनी हल्ला केला. बागेवाडी (ता. जत) गावच्या शिवारात झालेल्या या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार झाल्या असून २० मेंढ्या गायब आहेत.

sheep killed wolf attack
सांगली : लांडग्यांच्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार, २० गायब (image – pixabay/representational image)

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळांच्या मेंढ्याच्या कळपावर मंगळवारी मध्यरात्री लांडग्यांनी हल्ला केला. बागेवाडी (ता. जत) गावच्या शिवारात झालेल्या या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार झाल्या असून २० मेंढ्या गायब आहेत. या प्रकाराची वन विभागाने तातडीने दखल घेत पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधानगरी तालुक्यातील अंशेवाडी येथील बिरू विठ्ठल जोग हे मेंढपाळ अडीचशे मेंढ्याचा कळप घेऊन चारण्यासाठी जत तालुक्यात आले आहेत. सोमवारी रात्री बागेवाडी येथील नानासाहेब पडळकर यांच्या शेतात हा मेंढ्यांचा कळप वस्तीला होता. आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास लांडग्यांच्या झुंडीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मेढरे सैरभैर होउन इतस्तत: विखरून शिवारात पळाली. मेंढ्यांचा कालवा उठल्याचे पाहून मेंढपाळ व रानमालक यांनी धाव घेतली असता अनेक मेंढरे पळाली तर काही मेंढ्या लांडग्यांच्या हल्ल्यात जागीच मृत्यूमुखी पडल्याचे दिसले. या हल्ल्यात कळपात व शिवारात २६ मेंढ्या मृतावस्थेत आढळल्या असून काही मेंढ्या जखमी झाल्या आहेत. तर २० मेंढ्या गायब आहेत. या मेंढ्यांना लांडग्यांच्या टोळीने गायब केले असण्याचीच दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – चौंडीमधील धनगर उपोषण २१ व्या दिवशी मागे, गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तत्काळ…”

हेही वाचा – “…म्हणून मी अस्वस्थ आहे”, भाजपाबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची थेट भूमिका

ही माहिती मिळताच गावचे सरपंच करन शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य व वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाने घटनेचा पंचनामा केला असून या हल्ल्यात मेंढपाळाचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानग्रस्त मेंढपाळाला वन विभागाने जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी गावकर्‍यांनी वन कर्मचार्‍यांकडे केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 26 sheep killed 20 missing in wolf attack incident in sangli district ssb

First published on: 26-09-2023 at 18:27 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा