आंध्र प्रदेशातील गलाई व्यावसायिकाच्या घरावर दरोडा टाकून पळून आलेल्या संशयिताला मंगळवारी अटक करुन लुटीतील अडीच कोटीचे चार किलो सोने सांगली व आंध्र पोलीसांच्या पथकाने हस्तगत केले. या दरोड्यातील तीन संशयितांना पंधरा दिवसापुर्वी अटक करण्यात आली असून चौघाकडून ४ कोटी १७ लाख ५० हजाराचे लुटीतील ७ किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे.

नामदेव गुरुनाथ देवकर (वय ४० वर्षे) यांचा रा. बंगुरीवाडी रोड, दनुकू, ता. ठनुकू, जि. पश्चिम गोदावरी, राज्य आंध्र प्रदेश येथे सोने गलाईचा व्यवसाय असून ते सोने तारण व्यवसाय देखील करतात. आरोपी सुरज बळवंत कुंभार (व्यवसाय गलाई कामगार, रा. कुल, ता, खानापुर, जि. सांगली) हा मागील ४ वर्षापासून फिर्यादी यांचे दुकानात काम करीत होता. फिर्यादी व त्यांची पत्नी त्यांचे राहते घरी असताना आरोपी सुरज बळवंत कुंभार व त्याचे इतर साथीदारांनी घरात घुसून फिर्यादीस हत्याराचा धाक दाखवून हात पाय बांधून व तोंडावर चिकटपट्टी लावून, घरातील तिजोरीमधील सोन्याचे दागिने व बिस्किटे, रोख रक्कम लाख रुपये जबरदस्तीने लुटून फिर्यादीची सिल्हर रंगाची अल्टो कार घेवून निघून गेले होते.

offensive song during marriage marathi news
लग्नाच्या वरातीत आक्षेपार्ह गाणे; दोन गट भिडले, तिघे जखमी, चार ताब्यात
Decrease in water storage in dams compared to last year
नागपूर : गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात घट
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

हेही वाचा >>> मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला साताऱ्यात मोठा प्रतिसाद

सदर गुन्हयाच्या तपासाच्या अनुशंगाने आंध्रप्रदेश राज्यातील पोलीस पथक सांगली जिल्हयात हजर झाले होते. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस आंध्र प्रदेश राज्यातील पोलीस पथकास सदर आरोपी निष्पन करून त्यांना अटक करून त्यांचेकडून मुद्देमाल हस्तगत करणे कामी सहकार्य करणेबाबत आदेश दिले होते.

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व एक पोलीस पथक तयार करून आंध्र प्रदेश राज्यातून आलेल्या पोलीस पथकासोबत सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून त्यांचेकडून चोरीस गेला माल हस्तगत करण्याबाबत आदेश दिले होते.

हेही वाचा >>> महाराष्ट्रावर मोठं संकट, ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; केंद्र सरकारला मदतीसाठी आवाहन

उप निरीक्षक कुमार पाटील यांच्यासह सांगली पोलीसांचे पथक व आंध्र प्रदेशचे उप अधीक्षक सी. सरथ राजकुमार व पथक यांनी संयुक्त कारवाई करत संशयित आरोपी नितीन पांडुरंग जाधव (रा. कार्वे ता. खानापूर) हा विटा ते सांगली जाणारे रोडने पांढया रंगाच्या ॲक्टीवा मोटार सायकलवरून लिंब (ता. तासगाव) च्या दिशेने जात असताना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडे २ कोटी ४० लाखाचे चार किलो लुटीतील सोने मिळाले. यापूर्वी याच गुन्हयात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचे मदतीने आंध्रप्रदेश पोलीसांनी ३ आरोपी अटक केले असून त्यांचेकडून ३ किलोग्रॅम सोने किंमत १ कोटी ७७ लाख रुपयांचे लुटीतील सोने हस्तगत करण्यात आले आहे. या गुन्हयात ४ आरोपींना अटक करुन चार कोटी १७ लाख ५० हजार रुपयांचे ७ किलो सोने हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले.