बांधकाम व्यावसायिक-राजकीय हितसंबंध कारणीभूत असल्याचा आरोप

नाशिक : आपल्या अखत्यारीतील काही जागा तोफखाना दल देण्यास तयार नसल्याने लष्करी हवाई दलाचे (आर्मी एव्हीएशन) नाशिकमधील प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातून स्थलांतरीत होण्याच्या वाटेवर आहे.

akola loksabha election 2024 young man Parimal Asanare reached Akola from Singapore for voting
मन जिंकलस भावा! मतदानासाठी सिंगापूरवरून गाठले अकोला; विदेशातील तरुण विद्यार्थ्याला राष्ट्रीय कर्तव्याचे भान
Ozar, Air Force Chief,
ओझरस्थित देखभाल-दुरुस्ती केंद्राचा हवाई दल प्रमुखांकडून गौरव
Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

लष्करी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण देणारे देशातील एकमेव केंद्र नाशिकमध्ये आहे. देवळाली कॅम्पस्थित तोफखाना केंद्राची जागा सध्या या प्रशिक्षणासाठी वापरली जाते. ती कायमस्वरुपी देण्यास तोफखान्याने विरोध केला आहे. परिणामी, संरक्षण मंत्रालयाने लष्करी हवाई दलासाठी देशात नव्या जागेचा शोध सुरू केला आहे. मात्र हे केंद्र स्थलांतरीत करण्यात बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतल्याची तक्रार लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेने केली आहे. हवाई दलाचे प्रशिक्षण केंद्र या भागातून हटल्यास या भागात टोलेजंग निवासी बांधकामास परवानगी मिळविण्यात अडचणी येणार नाहीत, म्हणून हा छुपा डाव रचण्यात येत असल्याची जोरदार चर्चा आहे.

जागा सोडण्याबाबत उभय केंद्रांमध्ये पत्र व्यवहार सुरू असल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

भारतीय लष्करात हवाई दल हा इतरांच्या तुलनेत नवा विभाग आहे. लष्कराला दैनंदिन कामांसाठी प्रत्येकवेळी हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टरवर अवलंबून राहता येत नाही. दैनंदिन, युध्दकालीन गरजा भागविण्यासाठी या सहाय्यकारी दलाची स्थापना करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे आजतागायत स्वत:ची जागा नाही. दीड दशकांपूर्वी तोफखाना केंद्राने गांधीनगरच्या धावपट्टीसह आसपासची जागा उपलब्ध करून दिली. या परिसरात ‘कोम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन स्कूल’ची स्थापना करण्यात आली. दरवर्षी शेकडो वैमानिक येथून तयार होतात. पण तोफखाना दलाने  कायमस्वरूपी जागा देण्यास नकार दिल्याने प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे हलवावे लागणार आहे.

देवळाली कॅम्प परिसरात तोफखान्याचे प्रशिक्षण देणारे महत्वाचे केंद्र आहे. लष्कराच्या इतर सहाय्यकारी दलांचा विचार करता तोफखान्याचा पसारा मोठा असतो. त्यांची शहर आणि लगतच्या भागात सुमारे २५०० एकर जागा आहे. त्यात तोफांच्या सरावासाठी तीन फायरिंग रेंजचाही अंतर्भाव आहे. या केंद्रामार्फत ५० अभ्यासक्रमांद्वारे दरवर्षी दोन हजार अधिकारी-जवानांना प्रशिक्षण दिले जाते. गांधीनगर येथील लष्कराच्या धावपट्टीचा वैमानिकरहित विमान संचलनाच्या प्रशिक्षणासाठी वापर केला जातो. याच धावपट्टीचा वापर आर्मी एव्हीएशन हेलिकॉप्टर सरावासाठी करते. युध्द सरावासाठी केंद्राला धावपट्टी उपयुक्त ठरली आहे. पण तोफखाना दलास आता ही सर्व जागा परत हवी आहे.

निर्बंध हटल्यास काय होणार ?

शहरात सध्या कमाल ३६ मीटपर्यंत उंच इमारत बांधण्यास परवानगी दिली जाते. तोफखाना केंद्राच्या गांधीनगर धावपट्टीच्या सभोवतालच्या परिसरात मात्र धावपट्टीशी निगडीत (एअर फनेल झोन) र्निबधामुळे आसपासच्या क्षेत्रात किमान १२ ते कमाल ७३ फूट उंचीच्या बांधकामाला परवानगी दिली जाते, असे पालिकेच्या नगररचना विभागाकडून सांगण्यात आले. लष्करी हवाई दलाचे केंद्र स्थलांतरीत झाल्यास धावपट्टीशी निगडीत निर्बंध दूर होतील आणि सभोवतालच्या क्षेत्रात अन्य भागाप्रमाणे गगनचुंबी इमारती उभ्या राहू शकतात. गांधीनगर धावपट्टीच्या आसपास सध्या कमी उंचीची अर्थात एक वा दुमजली घरे दृष्टिपथास पडतात. केंद्र स्थलांतरीत झाल्यास या ठिकाणी उंच इमारतींचा मार्ग मोकळा होईल, याकडे लक्ष वेधले जात आहे.

अडचण काय?

वैमानिकांची कमतरता दूर करण्यासाठी महत्वाची कामगिरी करणाऱ्या हवाई प्रशिक्षण केंद्राला स्वत:च्या जागेचा प्रश्न भेडसावत आहे. कारण, तात्पुरत्या स्वरुपात दिलेली जागा परत मिळावी, अशी मागणी तोफखाना केंद्राने केली आहे.  लष्करी हवाई दलास आपल्या प्रशिक्षण केंद्रासाठी किमान ४०० एकर जागेची निकड आहे. तोफखाना दल आपली जागा कायमस्वरुपी देण्यास तयार नसल्याने मध्यंतरी संरक्षण मंत्रालयाने हवाई दलाच्या केंद्रासाठी झारखंडमधील जागा सुचविली होती. परंतु, नंतर तो प्रस्ताव बारगळला. आता राजस्थान, बिहार या राज्यात जागेचा शोध सुरू असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

जागेचा जो विषय आहे, तो लष्करी यंत्रणांची अंतर्गत बाब आहे. संरक्षण मंत्रालयामार्फत तो प्रश्न परस्पर समन्वयाने सोडविला जाईल. नाशिकमधून विविध प्रकल्पांचे स्थलांतरण अशा चर्चा का होतात, ते समजत नाही. तसे काही होणार नाही. लष्करी हद्दीलगतच्या परिसरात बांधकामांबाबत संपूर्ण देशात एकच निकष आहे. त्यावर सध्या काम सुरू असून नवीन निकष जाहीर होईपर्यंत जुने निकष अंमलात राहतील.

– डॉ. सुभाष भामरे (संरक्षण राज्यमंत्री)