एकनाथ शिंदेंनी बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे (uddhav-thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकत्र येणार का? याबाबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काल एक सुचक विधान केले होते. त्याबाबत आज मनसे नेते बाळानांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेशी युती करण्याबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

हेही वाच – नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का ? भुजबळांच्या मिश्किल प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची भंबेरी

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

“शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील. मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही. कारण यापूर्वी हे सर्व प्रयोग करून झालेले आहेत”, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावरकर यांनी दिली. दरम्यान आजच्या बैठकीत पक्षाच्या संघटनेबाबत सविस्तर चर्चा झाली असून उद्या संपूर्ण राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर राज ठाकरे स्वत: माध्यमांशी संवाद साधतील. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा – “कंबोज नावाच्या भोंग्याला…” रोहित पवारांवरील ट्वीटनंतर अमोल मिटकरींची खोचक टीका!

शर्मिला ठाकरे नेमकं काय म्हणाल्या होत्या?

काल पुण्यात मनसेच्या “गणपती आमचा किंमत तुमची २०२२” या आयेजित उपक्रमाचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले असले तरी ठाकरे बंधु एकत्र येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर “साद घातली तर येूऊ देत, मग बघू” असे सुचक वक्तव्य केले होते.