डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील एका नागरिकाला करोना झाल्याबद्दल शासकीय व खासगी चाचणी अहवालात वेगवेगळे निष्कर्ष आल्याने संबंधित व्यक्तीने क्वारंटाइन होण्यास नकार दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकीकडे आपल्याला करोना झाला नसल्याचे खाजगी तपासणीतून दिसून येत असताना शासकीय व्यवस्थेने कोणतीही लेखी सूचना न देता आपल्याला क्वारंटाइन कक्षात नेण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडला होता, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे.

चिंचणी येथील एका गृहस्थाने वैद्यकीय उपचार केले होते. त्या खाजगी डॉक्टरांना करोना संसर्ग झाल्याने १४ जुलै रोजी या गृहस्थांची शासकीय यंत्रणेने करोना चाचणी घेतली होती. १७ जुलै रोजी चिंचणी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या एका परिचारिकेने त्यांना करोना संसर्ग झाल्याचे सांगून त्यांना क्वारंटाइन केंद्रात जावे लागेल असे १६ जुलै रोजी सांगितले होते. या गृहस्थाने चाचणी अहवालाची मागणी केली असता डॉ. शरद गायकवाड यांनी तो देण्यास नकार दिला. परिणामी त्यांना क्वारंटाइन कक्षात नेण्यासाठी आलेल्या शासकीय अधिकारी व पोलिसांसोबत हुज्जत घालून नकार दिला.

Commodity SEBI Developed Commodity Futures Market print eco news
क… कमॉडिटीचा : हवामान वायद्यासाठी ‘सेबी’ने तत्परता दाखवावी
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
abhay daga upsc marathi news, abhay daga upsc latest marathi news
“नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा

दरम्यान, शासकीय अहवाल प्राप्त होत नाही म्हणून या नागरिकांनी केलेल्या खासगी चाचणीचा अहवाल १७ जुलै रोजी नकारात्मक आल्याने हा विषय समाज माध्यमांवर खूप गाजला. यासंदर्भात पालघरच्या जिल्हाधिकारी यांना नंतर विचारले असता करोना संसर्ग झालेल्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात सूचित करावे असे आदेश काढले.

दरम्यान, या गृहस्थाने करोना संक्रमणाच्या प्रतिबंधित उपाययोजनेत शासकीय व्यवस्थेला सहकार्य न केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश डहाणूच्या तहसीलदार यांनी काढले आहेत. एकीकडे करोना संसर्ग झालेल्या रुग्णांना लिखित आदेश दिले नसताना त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या शासनाच्या भूमिकेबद्दल चिंचणी गावांमध्ये वातावरण तापले आहे. तसेच करोना अहवाल घेऊन या गृहस्थाशी प्रशासनाने पुन्हा संपर्क साधणे अपेक्षित असताना तसे न करता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या शासकीय निर्णयाच्या व सुरू असलेल्या अनागोंदी कारभारबद्दल नागरिकांकडून नापसंती व्यक्त होत आहे.