उन्हाळ्याला सुरूवात होताच या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. उन्हाचा पारा ४४.२ अंश सेल्सिअस वर पोहचताच
गर्मी मुळे त्रस्त झालेले ग्रामीण भागातील लोक घराच्या अंगणात झोपतात. सिंदेवाही तालुक्यातील सरडपार चक येथे अंगणात झोपलेल्या माणिक बुद्धा नन्नावरे (७०) याचेवर रात्री बिबट्याने हल्ला केला असता घटनास्थळी मृत्यु झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीची आहे.
जंगला लागत हे गाव आहे त्यामुळे अंगणात झोपणे माणिक बुद्धा नन्नावरे च्या जीवावर बेतले. काल रात्रौ, तो बाहेर अंगणात झोपलेला असताना बिबट्यांनी त्याची शिकार केली. यामुळे बुधा ननावरे जागीच ठार झाला.
सरडपार चक येथे अंगणात झोपून असलेल्या या व्यक्तीला बिबट्याने रात्रौ ठार केले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून, जंगलातील वन्यप्राणी गावात येऊन शिकार करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.

Maharashtra News Live: “आता भाजपाच्याच सहकाऱ्यांना कुठं बसवायचं हा…”, जयंत पाटलांचा खोचक टोला!