scorecardresearch

Premium

१२ वर्षांनी चतुर्ग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’? मिळू शकतो प्रचंड पैसा

‘चतुर्ग्रही योग’ सूर्य, राहू, बुध आणि गुरु यांच्या युतीमुळे तयार होईल.

chaturgrahi yog
गुरू १२ वर्षांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट अंतराने गोचर करून शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो. अशातच आता मेष राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. हा योग एप्रिल महिन्यात सूर्य, राहू, बुध आणि गुरु यांच्या युतीतून तयार होईल. कारण गुरू १२ वर्षांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या योगाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. परंतु ३ राशी अशा आहेत. ज्यासाठी हा काळ आर्थिक लाभाचा आणि प्रगतीचा ठरु शकतो.

मेष राशी –

Sakat Chauth Sankashti Chaturthi 100 Years Later Two Extreme Rare Yog Trigahi These Three Rashi To Earn Huge Money Ganpati Blessing
Sakat Chauth: १०० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला दोन दुर्मिळ योग बनल्याने ‘या’ तीन राशींचे आयुष्य होईल मोदकासारखे गोड
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
Rahu Shukra Yuti After 12 Years Golden Pot Of Money Can Be Brought By Lakshmi For These Rashi Astrology Today In Marathi
१२ वर्षांनी महायुतीत येणार दोन बलाढ्य ग्रह! सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार?
Umred Karhandla Sanctuary
VIDEO : तीन महिन्यांच्या बछड्यांसह वाघिणीचा ‘रॅम्प वॉक’, एकदा बघाच….

चतुर्ग्रही योग मेष राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या लग्न स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा पाहायला मिळू शकते. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तसेच या वेळी तुम्ही भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करू शकता. तर नोकरदारांना नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. परंतु या काळात विवाहित लोकांना काही समस्या येऊ शकतात.

कन्या राशी –

कन्या राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग लाभदायक ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून आठव्या स्थानी तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काही आजारातून मुक्ती मिळू शकते. शिवाय तुमचे कौशल्य आणि अधिक जबाबदारी घेण्याच्या वृत्तीमुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होण्याचीही शक्यता आहे. या महिन्यात काही आर्थिक आव्हाने येऊ शकतात, म्हणजेच काही बिनकामाचा खर्च होण्याची शक्यता आहे.

धनु राशी –

चतुर्ग्रही योग धनु राशीसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी तयार होत आहे. दरम्यान, या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तर तुम्हाला प्रेमसंबंधातही यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन कौशल्ये विकसित करण्यावर आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी हा काळ चांगला ठरु शकतो. या काळात तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chaturgrahi yoga is forming in aries the fortune of people of this sign will be bright jap

First published on: 08-04-2023 at 07:00 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×