महापालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक दोन ट्रॉमेल यंत्रे दाखल

वसई : कचराभूमीतील साठलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी पालिकेने  दोन अत्याधुनिक ट्रॉमेल यंत्रे घेतली आहेत. या यंत्राद्वारे कचराभूमीतील कचऱ्याचे ढीगारे नष्ट  करण्याबरोबरच कचराभूमीत येणाऱ्या कचऱ्यातील विविध घटक वेगळे केले जाणार आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोपे जाणार आहे.

Mumbai, parks, misused, mnc,
मुंबई : १२ उद्यानांचा गैरवापर होत असताना पालिकेची डोळेझाक
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

महापालिकेची वसई पूर्वेच्या गोखिवरे येथे कचराभूमी आहे. येथे दररोज साडेसातशे मेट्रीक टन कचरा जमा होतो. नागरिकांकडून जरी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जात असला तरी कचराभूमीवर हा कचरा एकत्र टाकण्यात येतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सध्या कुठल्याही प्रकारची यंत्रणा पालिकेकडे नाही. कचराभूमीवर  कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत.  त्यामुळे दुर्गंधी आणि इतर समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. ती सोडविण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक ट्रॉमेल यंत्रे आणली आहे.  एका यंत्राची किंमत ही २५ लाख रुपये एवढी आहे. सध्या दोन यंत्रे पालिकेने घेतली आहेत.

याबाबत माहिती देताना पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभागी साहाय्यक आयुक्त  नीलेश जाधव यांनी सांगितले की, कचऱ्याचे डोंगर ही मुख्य समस्या होती. त्यासाठी  ही यंत्रे आणली आहेत.  आणखी दहा यंत्रे आणली जाणार आहेत. यामुळे कचराभूमीवर असलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे सोपे जाईल.

कचराभूमीत वेगवेगळ्या प्रकारचा कचरा येत असतो. त्यात वेगवेगळे घटक असतात. यंत्रामुळे कचऱ्यातील घटक वेगळे करता येतील. त्यात प्लास्टिक, ई कचरा, सुका कचरा, ओला कचरा असे घटक वेगळे करता येतील, असे ते म्हणाले.

कचरा ही मोठी समस्या आहे. ती दूर करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचा एक भाग म्हणून अत्याधुनिक ट्रॉमेल यंत्रे आणत आहोत. सध्या दोन यंत्रे आणली असून लवकरच दहा यंत्रे येतील. यामुळे कचऱ्याचे डोंगर नष्ट होतील, तसेच इतर कचऱ्याचे वर्गीकरण करता येणार आहे

– गंगाधरन डी., आयुक्त, वसई विरार महापालिका