वाई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे (ता महाबळेश्वर) गावच्या यात्रेसाठी साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते दुसऱ्यांदा यात्रेसाठी आल्याने गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले. महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब उचाट आदी पंधरा गावांची मिळून उत्तरेश्वर यात्रा भरते. यासाठी मुख्यमंत्र्यांचे दोन दिवसांच्या मुक्कामी गावी मंगळवारी सायंकाळी आगमन झाले. मुख्यमंत्री जिल्ह्यातील विकास कामांची माहिती घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “मोरारजी देसाईंचे पोलीस लालबाग-परळच्या चाळींवर…”, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ‘त्या’ कृतीवरून ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा होणार आहे. गावच्या यात्रेशिवाय मुख्यमंत्र्यांचा दुसरा कोणताही कार्यक्रम जाहीर झालेला नाही. परिसरातील ग्रामस्थांच्या व साताऱ्यातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि शेत शिवार भेट असा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री सायंकाळी हेलिकॉप्टरने आल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख  यांनी प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. यावेळी सातारा पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. यावेळी वाईचे प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव ,वाईचे पोलीस उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण भालचिंम मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक प्रवीण भिलारे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग व सेंद्रिय शेती केली आहे. त्यांची पाहणी ते करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शेतात  स्ट्रॉबेरी, सुपारी, लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, मिरची, हळद अशी पिके घेतली आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबर शिंदे गटाचे नेते आज स्वागतासाठी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on two day visit to satara for village yatra zws
First published on: 23-01-2024 at 19:21 IST