राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली आणि सर्वसमान्यांपासून ते सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळीपर्यंत सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत असलेली खासदार संजय राऊत यांची स्फोटक पत्रकार परिषद अखेर आज दुपारी झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपा, केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. शिवाय, शिवसेना कोणत्याही दबावाला झुकणार नाही, ठाकरे सरकार राज्यात कायम राहणार असल्याचे सांगितले. तसेच, भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील संजय राऊत यांनी यावेळी काही गंभार आरोप केले. ही पत्रकार परिषद संपल्यावर यावर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेनेचा मित्र पत्र असणाऱ्या काँग्रेसकडूनही या पत्रकार परिषदेवर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

“शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजपा नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी. ”, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
aap jantar mantar hunger strike
महात्मा गांधी ते ममता बॅनर्जी; उपोषण हे ‘राजकीय शस्त्र’ म्हणून कसे वापरले गेले?
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची भूमिका मांडताना म्हटले की, “संजय राऊत यांनी जी पत्रकारपरिषद घेतली त्यात खूप वास्तव समोर आलेलं आहे. आम्ही दुधाने धुतलेलो आहोत, असा हेका लावणारी भाजपा आज त्यांच्या भ्रष्टाचारांमुळे संपूर्ण उघडी झाली आहे. या निमित्त ईओडब्ल्यूच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने या सगळ्याची चौकशी करून, योग्य ती कारवाई केली पाहिजे ही मागणी काँग्रेसची आहे. ”

Sanjay Raut Press Conference Live: आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है ! – अमृता फडणवीस

तसेच, “संजय राऊत यांनी सांगितलं आहे की ते सर्व कागदपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आम्ही देणार आहोत, तर त्यांनी देखील तातडीने ही चौकशी केली पाहिजे. ” अशी मागणी देखील पटोले यांनी यावेळी केली.

याचबरोबर, “ईडी बद्दल त्यांच्या जो मोठा आक्षेप जो होता, त्या आक्षेपात जर आपण पाहिलं की काही बिल्डर्सना ब्लॅकमेल करून, ईडी पैसा जमा करते आणि जवळपास ३०० कोटी रुपये यामध्ये त्यांनी जमा केलेले आहेत. हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी जमा केले जातात की अमित शाह यांच्यासाठी जमा केले जातात? हा देखील महत्वाचा विषय आहे. की या पद्धतीच्या संस्था त्यांना केंद्रातील सरकारचं संरक्षण असल्यावरच अशा प्रकारची कारवाई करत असतील हे देखील नाकारता येत नाही. ” असंही नाना पटोले यांनी बोलून दाखवलं आहे.

हे सरकार पडणार नाही आम्ही सर्व एकत्र आहोत –

याशिवाय, “केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्याचे षडयंत्र सुरु आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे ब्लॅकमेल करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे हे आम्ही वारंवार सांगितलेले आहे. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबी, एनआयएच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कारवायांमधून हे दिसून आले आहे. सरकार पाडण्यासाठी उताविळ झालेले भाजपाचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु महाविकास आघाडी सरकार भक्कम असून हे सरकार पडणार नाही आम्ही सर्व एकत्र आहोत. संजय राऊत यांनी आज पुराव्यासह भाजपातील नेते व भाजपाशी संबंधित लोकांचे काळे धंदे उघड केले आहेत. घोटाळ्यांचे आरोप करणारे सोमय्यासारखे भाजपवालेच घोटाळेबाज आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.” असे पटोले म्हणाले.

फडणवीस सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाल्याचे काँग्रेस पक्षाने वारंवार सांगितले होते, पण…-

तर, “फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोपही राऊत यांनी केले आहोत. भाजपाच्या एका माजी मंत्र्यांने मुलीच्या लग्नात नऊ कोटींचे कारपेट अंथरल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. फडणवीस सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाल्याचे काँग्रेस पक्षाने वारंवार सांगितले होते पण फडणवीसांनी कसलीही कारवाई न करता सगळ्या घोटाळेबाजांना क्लिन चिट देऊन टाकल्या होत्या. आता मविआ सरकारने या घोटाळ्यांचीसुद्धा चौकशी करावी. ” अशी मागणी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली.