दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोलीस कोठडीत एम. एस. रेड्डीची कसून चौकशी

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार याला आधीच अटक करण्यात आली होती.

निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार याने दीपाली चव्हाण यांचा प्रचंड मानसिक छळ के ला होता.

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त के ल्याचा आरोप असलेल्या निलंबित क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी याची पहिली रात्र धारणी पोलीस ठाण्याच्या कोठडीत गेली. चौकशीदरम्यान तो सहकार्य करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, शुक्र वारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी धारणी पोलीस ठाण्याला भेट दिल्याची माहिती आहे.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार याला आधीच अटक करण्यात आली होती. आता एम.एस. रेड्डी याच्यावर देखील आत्महत्येस प्रवृत्त के ल्याचा गुन्हा नोंदवण्यात येऊन त्याला नागपूरहून ताब्यात घेण्यात आले. धारणी येथील न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या संपणार आहे.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील करीत आहेत. विनोद शिवकु मार याने दीपाली चव्हाण यांचा प्रचंड मानसिक छळ चालवला होता. त्याविषयी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक असलेल्या एम.एम. रेड्डींकडे तक्रोरी करूनही त्यांनी विनोद शिवकु मार याच्या कृ त्यांकडे दुर्लक्ष के ल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता रेड्डी याला सहआरोपी करण्यात आले आहे.

दीपाली यांनी रेड्डीकडे कोणत्या स्वरूपात तक्रोरी के ल्या, त्यानंतर काय हालचाली झाल्या, याविषयीचे पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू के ले आहे.

रेड्डी याला उद्या न्यायालयात हजर के ले जाणार असून पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले जाते की पोलीस कोठडी वाढवून मिळते, हे उद्या स्पष्ट होणार आहे. रेड्डी यांची भेट घेण्यासाठी त्यांचा मुलगा धारणी येथे पोहचला होता. त्याने काही कपडे सोबत आणले होते. हे कपडे पोलिसांनी स्वीकारले की नाही, हे कळू शकले नाही.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी  एम.एस. रेड्डी यांच्या भूमिके विषयी चौकशी करण्याचे काम आयपीएस अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या समितीला सोपवण्यात आले आहे. ही समिती आपला अहवाल लवकरच सादर करणार आहे.

निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार याने दीपाली चव्हाण यांचा प्रचंड मानसिक छळ के ला होता. याची माहिती एम.एस. रेड्डी यांना त्यांनी वेळोवेळी दिली होती. त्यामुळे रेड्डी यांनी आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचे पालन व्यवस्थित न के ल्याची बाब दीपाली यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरली का, याची चौकशी करण्याचे काम डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या समितीकडे सोपवण्यात आले आहे. दोन दिवस चौकशी के ल्यानंतर डॉ. प्रज्ञा सरवदे अमरावतीहून परत गेल्या, त्याच दिवशी रेड्डीच्या अटके ची कारवाई झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deepali chavan suicide case m s reddy face tough investigation in police custody zws