पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल एवढी मोजली गेली. रात्री साडेदहा वाजता भूकंपाचे धक्के बसले. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात ते जाणवले. कोल्हापूरमधील शाहुवाडी तालुक्यात भूकंपाचे केंद्र होते. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिवाय, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित आहेत.