जून २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना बरोबर घेत पक्षाविरोधात दंड थोपटले. या आमदारांना विश्वासात घेऊन शिंदे यांनी वेगळा गट बनवला. या गटाने भाजपाबरोबर राज्यात सत्तास्थापन केली. तसेच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पाठोपाठ शिंदेंच्या गटाने मूळ शिवसेना पक्षावर दावा केला आणि निवडणूक आयोगाने शिंदेंच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. तसेच पक्षाचं अधिकृत चिन्हदेखील त्यांनाच बहाल केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. एकनाथ शिंदे बंडखोरी करून सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. दरम्यान, ते आणि त्यांच्याबरोबरचे आमदार सुरतमध्ये असताना नेमकं काय घडलं होतं. पडद्यामागे कोणत्या हालचाली केल्या जात होत्या यावर शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही सुरतला गेल्यावर उद्धव ठाकरे भाजपा नेतृत्वाला फोन करून म्हणाले…”, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ४० आमदार बंडखोरी करून सुरतला गेलेले असताना पडद्यामागे काय-काय घडत होतं? यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
Written by अक्षय चोरगे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-04-2024 at 15:44 IST
TOPICSउद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeभारतीय जनता पार्टीBJPमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra PoliticsशिवसेनाShiv Sena
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde claims uddhav thackeray offers bjp leadership will come with you asc