महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे गेल इंडिया ही ५० हजार कोटींची गुतंवणूक करणारी कंपनी येणार होती. परंतु, हा प्रकल्प आता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे. त्यामुळे आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राबाहेर गेलेल्या गेल इंडिया प्रकल्पाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, “आरोप कराला काय लागतं? तुम्ही वेदांतचे आरोप करत होते. तेव्हा आमचं सरकार २ महिन्यांचं होतं. दोन महिन्यांत उद्योज जातो किंवा येतो का? त्याच्यासाठी सहा महिन्यांची तयारी करावी लागते. पण आम्ही दोन वर्षांत सहा कोटींचे उद्योग आणले. त्यात १ लाख ८० कोटींचं प्रदर्शन सुरू आहे.

हेही वाचा >> महाराष्ट्रात येणारा ५० हजार कोटींचा उद्योग राज्याबाहेर गेला; विरोधकांकडून टीका

“आता परदेशी गुंवतणुकीत महाराष्ट्र क्रमांक एकला आहे. महाविकास आघाडी चार नंबरला गेली होती. इंडस्ट्रिअल फ्रेंडली राज्य म्हणून आपली ओळख आहे. राज्यांमध्ये पायाभूत सुविधा आहेत. कनेक्टिव्हिटी, मॅनपॉवर आहे. म्हणून उद्योग येत आहे. पूर्वी लोक उद्योगपतींच्या खाली बॉम्ब लावून पळून जायचे. आता ते होत नाही. आता आम्ही उद्योजकांना पूर्ण सुरक्षितता दिली आहे. रेड कार्पेट दिलं आहे, सिंगल विंडो क्लिअरन्स दिलंय. आम्ही सबसिडी दिली, त्यामुळे उद्योग आमच्याकडे महाराष्ट्रात येणार”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठवाड्यात १८३७ टँकर सुरू

मराठावाडा विभागाची पाणीटंचाई, चाराटंचाई यासंदर्भात बैठक आयोजित केली होती. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, पावसाळ्यापूर्वी कामाचं नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. मराठवाड्यात १८३७ टँकर सुरू आहेत. आणि ५१२ गावांत हे टँकर जातात. हे टँकर आणखी आवश्यकता भासली तर खालच्या अगदी ग्रामसेवकापर्यंत,तलाठ्यापर्यंत सूचना दिल्या आहेत की तुमची रिक्वायरमेंट पाठवा, तीन दिवसांत सोय केली जाईळ. टँकरची आवश्यकता वाढली तर तत्काळ ग्रामस्थाने जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क करणे.