केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मे पासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र लसीकरणाविषयी चर्चा सुरू झाली होती. राज्यातल्या तरूण वर्गाने लसीकरणाची तयारी देखील केली होती. मात्र, राज्यात या वर्गासाठी १ मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये यासंदर्भातला निर्णय झाल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असला, तरी येत्या ६ महिन्यात १८ ते ४४ या वयोगटातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण होणार!

“१ मे ला राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. आज लगेच आपल्याला लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरपर्यंत जर लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत. त्यामुळे तरुणांना माझं नम्र आवाहन आहे की आपण सगळ्यांना मोफत लसीकरण करतो आहोत. पण आता समजुतदारीने काम घ्यावं लागणार आहे. नोंदणीसाठी कोविन अॅप वापरणं सक्तीचं आहे. त्यामुळे आधी नोंदणी करूनच नोंदणी केंद्रावर जाता येणार आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे”, असं यावेळी राजेश टोपे म्हणाले.

“वर्गवारीनुसार लसीकरणावर विचार सुरू”

“आपल्याला इच्छा असूनसुद्धा लसी उपलब्ध होत नसल्यामुळे १ मे ला लसीकरण सुरू करता येणार नाहीये. पण आपण यावर काम करत आहोत. ५ कोटी ७१ लाख लोकांना लसीकरण करायचं आहे. त्यासाठी वरीष्ठ मंत्र्यांची एक समिती याचं सूक्ष्म नियोजन करत आहे. १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ अशा वर्गवारीवर काम सुरू आहे. ३५ ते ४४ हा गट आधी घेता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यातले सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का? यावर देखील विचार सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र वेगळे असतील आणि ४५ वयोगटाच्या पुढचे केंद्र वेगळे असतील”, अशी देखील माहिती राजेश टोपे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

“तरुणांनी अतीउत्साहात केंद्रांवर गर्दी करू नये”

“लस उत्पादकांना केंद्र सरकारला एकूण उत्पादनातले ५० टक्के लसीचे डोस द्यावे लागणार आहेत. तर ५० टक्के लसीचे डोस राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विक्रीसाठी देण्यास सांगितले आहेत. त्यामुळे आपल्याला लसीच्या डोसच्या उपलब्धतेचं मोठं आव्हान असणार आहे. केंद्रांवर गर्दी न करता आणि हे केंद्र करोना पसरवणारे केंद्र होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. तरुण अतीउत्साहाने तिथे जाऊ शकेल. त्यामुळे येत्या ६ महिन्यांत लसीकरण पूर्ण करायचं आहे. पण ते सबुरीने करावं लागणार आहे. घाईगडबड न करता राज्य स्तरावरचा चांगला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन माझं राज्यातल्या जनतेला आहे”, असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं.

Thane, ST, bogus certificate,
ठाणे : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटी महामंडळात नोकरी

Shikhar Bank Malpractice Case There has been no irregularity in the working of the bank
शिखर बँक गैरव्यवहारप्रकरण : बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही

sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही