गंगा नदीमध्ये वाराणसी ते दिब्रूगढ पर्यंत पर्यटकांना फिरायला नेणारी जगातली सर्वात लांबलचक क्रूझ गंगा विलास सोमवारी सकाळी बिहारच्या सारणमध्ये पाण्यातच थांबली होती. गाळात अडकली त्यामुळे ही बोट किनाऱ्यापर्यंत पोहचू शकली नाही. चिरांदच्या अलिकडे नदीत गाळ असल्याने ही बोट किनाऱ्यापर्यंत पोहचलीच नाही. त्यानंतर मग छोट्या बोटी आणून त्यात पर्यटकांना बसवून किनाऱ्यावर आणलं गेलं. त्यानंतर चिरांदमध्ये आणून तिथली ऐतिहासिक ठिकाणं दाखवण्यात आली.

हे पण वाचा विश्लेषण : कशी आहे क्रूझ ‘गंगा विलास’? प्रवासभाडे किती? पर्यटनस्थळे कोणती?

Gokhale bridge, beam,
गोखले पुलाच्या जोडणीला विलंब, तुळईच्या सुट्या भागांना उशीर, कंत्राटदाराकडून खुलासा मागवणार
nalasopara, Massive Fire at Dwarka Hotel, Fire at Dwarka Hotel nalasopara, fire in nalasopara, fire in nalasopara hotel, marathi news, fire brigade fire news,
नालासोपाऱ्यात गॅस गळतीमुळे भीषण आग, तीन जण जखमी; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू
pune, Gang Vandalized Vehicles, Bibwewadi, Gang Vandalized Vehicles in Bibwewadi, koyta, unleashed terror, pune Gang Vandalized Vehicles, crime news, pune police, marathi news, crime in pune,
पुण्यात गोळीबाराच्या घटनांनंतर आता कोयता गँगचा राडा सुरू
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार

गंगा विलास क्रूझ गाळात अडकली

गंगाल विलास क्रूझवर असलेल्या पर्यटकांना चिरांदचा किनारा पाहायचा होता. मात्र किनारा येण्याआधीच ही बोट गाळात अडकल्याने पुढे जाऊ शकली नाही. बिहारमध्ये गंगेचे जे किनारे आहेत तिथे ही बोट पुढे जाणार आहे तिथल्या काही ठिकाणीही अशी घटना पुन्हा घडू शकते. कारण या ठिकाणी अनेक किनाऱ्यांवर क्रूझ किनाऱ्याला किंवा धक्क्याला लागेल इतकं खोल पाणी नाही. अमर उजालाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

चिरांदमध्ये नेमकं काय घडलं?

चिरांद या ठिकाणी जो बोटीचा धक्का आहे तिथे पोहचताना कमी पाण्यामुळे गंगा विलास ही महाकाय क्रूझ गाळात अडकली. क्रूझ किनाऱ्यापर्यंत येऊ शकणार नाही याचा अंदाज होताच त्यामुळे छोट्या बोटी तयारच होत्या. धक्क्यापासून ८०० मीटरवर अंतरावर असलेल्या या बोटीजवळ इतर छोट्या बोटी पाठवण्यात आल्या. छोट्या बोटींनी जेव्हा पर्यटक किनाऱ्यावर आले तेव्हा ढोल वाजवून आणि माळा घालून त्यांचं स्वागत कऱण्यात आलं. यानंतर या बोटीतले पर्यटक चिरांमध्ये गेले त्यांनी तिथल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. अनेक विदेशी पर्यटकांनी गावातल्या लोकांसोबत फोटोही काढले.

बिहारमध्ये गंगा नदीचे तट आणि क्रूझची डोकेदुखी

बिहारमधले गंगा नदीचे तट हे गंगा विलास क्रूझची डोकेदुखी ठरू शकतात कारण अनेक ठिकाणी क्रूझ किनाऱ्यापर्यंत पोहचू शकेल एवढं खोल पाणी नाही. गंगा नादीतून गाळ काढण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकदा पुढाकार घेतला आहे. गंगा नदीतला गाळ उपसा करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्चही करण्यात आले आहेत. तरीही पावसाळा सोडला तर गंगा नदीच्या तटांवर पाणी कमीच असतं. त्यामुळे गंगा नदीच्या तटांवर असलेलं कमी पाणी महाकाय गंगा विलास क्रूझ साठी डोकेदुखी चं ठरू शकतं.