राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर भारताच्या प्रतिमेत बदल झाला हे सांगतानाच आता चीनही भारताकडे वाकड्या नजरेने पाहत नाही, असा दावा केला आहे. तसेच आधी पाकिस्तानही डोळे दाखवायचा असं सांगत टीका केली. ते रविवारी (२५ जून) ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या निमित्ताने नांदेडमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपा-शिंदे गटाचे आमदार, खासदारही उपस्थित होते.

गिरीश महाजन म्हणाले, “आज आम्ही जेव्हा परदेशात जातो, देशाचं नाव भारत सांगतो त्यावेळी लोक डोळे फाडून आमच्याकडे बघतात. भारत, मोदीजी असं विचारतात. आम्हाला याचा केवढा मोठा अभिमान आहे. पाकिस्तानसारखं राष्ट्र आम्हाला नेहमीनेहमी डोळे दाखवायचं. आज पाकिस्तान जगाच्या नकाशावर आहे की नाही, खायला महाग झाले आहेत.”

revanth reddy jibe on BJPs 400 Paar Slogan
“भाजपाला ४०० पार व्हायचं असेल तर पाकिस्तान, अफगाणिस्तान…”, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा टोला
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
Maldives Minister Mariyam Shiuna
मालदीवच्या निलंबित मंत्र्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान; तीव्र प्रतिक्रिया उमटताच मागितली माफी

व्हिडीओ पाहा :

“आता चीनही भारताकडे वाकड्या नजरेने पाहत नाही”

“आता चीनही भारताकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. कुणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे भारताला एक सक्षम पंतप्रधान लाभले आहेत,” असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : VIDEO: “देवेंद्र फडणवीसांनी या माजी मुख्यमंत्र्यांना अनेकदा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

“पूर्वी बाहेर देशात गेल्यावर भारतीयांना उधारीवाले म्हणायचे”

जगातील भारताच्या प्रतिमेवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “१५ दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतात आले होते. ते एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यांनी पायाला हात लावून नमस्कार केला. मित्रांनो ही छोटी गोष्ट नाही. पूर्वीचा देश आठवा. त्यावेळी आम्ही बाहेर देशात जायचो, तेव्हा कुठेही गेल्यावर देशाचं नाव भारत सांगितल्यावर लोक बारीक डोळे करायचे. हे उधारीवाले लोक आहेत म्हणायचे. हे मागणारेच लोक आहेत असं म्हणायचे.”