वाई: वाई बस स्थानकावर आज दुपारी एस टी बसच्या चाकाखाली येऊन १३ वर्षीय मुलगी जागीच ठार झाली. श्रावणी विकास आयवळे (रा. सुलतानपूर, ता. वाई,) असे मुलीचे नाव आहे.

आज शनिवार असल्याने शाळा आणि महाविद्यालय एकाच वेळेला सुटली त्यामुळे बस स्थानकावर घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. मांढरदेव लगत असणाऱ्या गावी वाई बालेघर गाडी क्र.( एम एच १४ बी टी ०४९६) ही बस फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ झाला. त्यामध्ये श्रावणी आयवळे ही मुलगी मागे फेकली गेली. याच वेळी बस मागे सरकत होती. बसच्या मागील चाकाखाली येऊन मुलीचा मृत्यू झाला. ही तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालयात इयत्ता ७ वी मध्ये शिकत होती.

mumbai, Two Workers Die, One Critical, Falling into Toilet Tank, malad, pimpripada, Construction Site, marathi news, malad news, mumbai news, workers fell tank in malad
मालाडमध्ये शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
Senior police inspector Daya Nayak and Salman Khan
सलमान खानच्या घराजवळ गोळीबाराचं प्रकरण, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
accident in Uran, Two died accident uran
उरणमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू

आणखी वाचा-कोल्हापुरात महालक्ष्मी देवीचा अवभृत स्नान सोहळा उत्साहात

अचानक झालेल्या घटनेमुळे बस स्थानकावर एकच खळबळ उडाली. बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक, वाहतूक नियंत्रक, परीवेक्षाधिन पोलीस सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी झालेली गर्दी पोलिसांनी हटवली.

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक जीवन मारुती भोसले (राहणार नांदवळ वय ३६) याला ताब्यात घेतली असून वाई पोलीस अधिक तपास करीत आहेत