‘लग्नाळू’ शेतकरी मुलांपुढील समस्येने हुंडा प्रथेच्या चक्रात बदल

शेतकरी आत्महत्यांमागे नैसर्गिक आणि शासनाच्या अनास्थेने निर्माण झालेल्या कारणांप्रमाणेच शेतकऱ्यांनी स्वत:भोवती लपेटून घेतलेले सामाजिक प्रतिष्ठेचे वेष्टणही कारणीभूत असल्याचे मानले जाते. या वेष्टणामुळे आर्थिक परिस्थिती नसतानाही मुला-मुलींच्या लग्नाचा बार धूमधडाक्यात उडवून देण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या बहुतांशी शेतकरी कुटुंबीयांना आता बदलत्या परिस्थितीत मुलांचे लग्न जमविण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, पिकासंदर्भातील अनिश्चितता यामुळे इतरांप्रमाणे शेतकरीही शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी देण्यास नकार देऊ लागल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळू लागली आहेत. त्यामुळे  कित्येक गावांमध्ये निव्वळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या अनेक युवकांचे वय होऊनही लग्न जमत नसल्याने अस्वस्थ पालक लग्नाचा मुलीकडील सर्व खर्च करण्यासही तयारी दर्शवीत आहेत. याच कारणामुळे ग्रामीण भागात वधू-पित्याच्या मानगुटीवर बसलेले हुंडय़ासारख्या अनिष्ट प्रथेचे भूत काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ लागली आहे.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
| mangal gochar 2024 mars transit in aries these zodiac sign get more profit
एका वर्षानंतर मंगळ ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना नशीब देईल साथ, धन-संपत्तीत होईल वाढ
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ

शेतकरी आज विविध कारणांमुळे अडचणीत आला आहे. त्यापैकी शेतमालास मिळणाऱ्या अनिश्चित भावाच्या चक्रामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक कारणांची जाहीररीत्या चर्चा होत असली तरी सामाजिक पातळीवर परिणामकारक ठरू लागणारी कारणे अजूनही गावाची वेस ओलांडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न जमविण्यात येणारी अडचण हे त्यांपैकीच एक कारण. विशेष म्हणजे अगदी गरीब शेतकरीही दुसऱ्या शेतकऱ्याला मुलगी देण्यास नकार देत असल्याने या मुलांचे लग्न जमवायचे कसे, हा सामाजिक प्रश्न झाला आहे. मुलींच्या कमी जन्मदराचे एक कारण या समस्येसाठी दिले जात असले तरी ते फारसे योग्य नाही. नाशिक जिल्ह्य़ात फेब्रुवारी २०१७ ते २०१८ या कालावधीत ६१ हजार १६९ मुलांचा, तर ५७ हजार १६० मुलींचा जन्म झाला. म्हणजेच मुलींचा जन्मदर दर हजारी ९३४ असा बऱ्यापैकी आहे. जिल्ह्य़ातील तीन ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या अनेक गावांमध्ये लग्नाचे वय होऊनही लग्न जमत नसलेल्या शेतकरी मुलांची संख्या ३५ ते ५० पर्यंत गेली आहे.

बागलाण तालुक्यातील बहिराणे हे सहाशेपर्यंत लोकसंख्या असलेले गाव. या गावात सध्या १२ ते १५ जण तीन-चार वर्षांपासून लग्न होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हे सर्व शेतकरी आहेत. विशेष म्हणजे, लग्नाचा खर्च आम्ही करतो. तुम्हाला हवा असेल तर पैसा देतो, परंतु मुलगी द्या, अशी विनवणी मुलांच्या पालकांकडून करण्यात येत असतानाही त्यांना मुलगी मिळणे अवघड झाले आहे. अर्थात ही समस्या एकटय़ा बहिराणे या गावापुरती मर्यादित नाही. नाशिक जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये अशी स्थिती दिसून येईल. निफाड या सर्वदृष्टय़ा सधन तालुक्यातील ओझर येथील शेतकरी मुलाच्या पालकाने खर्चाचा दोन्ही बाजूंचा भार पेलण्याची तयारी दर्शविली, तेव्हा कुठे मुलीच्या पालकांनी लग्नास संमती दिली. मुलांच्या पालकांकडून एखाद्या शाळेत, बँकेत किंवा कंपनीत काम करणाऱ्यालाही शेतकऱ्यांपेक्षा अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. अर्थात, या समस्येमुळे ग्रामीण भागातील हुंडय़ाच्या अनिष्ट प्रथेस काही प्रमाणात का होईना आळा बसण्यास मदत होऊ लागली आहे.

स्त्री-पुरुष जन्मदरातील फरकामुळे मुलींची संख्या कमी आणि मुलांची अधिक अशी स्थिती आहे. मुलीस लग्नासाठी अनेकांकडून मागणी येत असल्याने शेतकऱ्यांसह प्रतिष्ठा नसलेल्या लहान व्यावसायिकांना मुलीच्या पालकांकडून नकार देण्यात येतो. याशिवाय ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाल्याने त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मुलींच्या पालकांकडून नोकरीवाल्या मुलास प्राधान्य देण्यात येत असल्याने काही ‘लग्नाळू’ शेतकरी मुले काही दिवसांसाठी कुठे तरी नोकरी मिळवीत असल्याचेही दिसू लागले आहे. एक लाख रुपये देतो, परंतु मुलगी द्या, अशी विनवणी शेतकरी पालकांकडून करण्यात येऊनही मुलांचे लग्न जमविण्यात अडथळे येत आहेत. ही निश्चितच गंभीर आणि भयावह समस्या म्हणावी लागेल.   – प्रा. शं. क. कापडणीस, अध्यक्ष, साहित्यायन संस्था, सटाणा, नाशिक

आमचे सुमारे सहाशे लोकसंख्या असलेले गाव आहे. गावात लग्नाची १२ ते १५ मुले आहेत. सर्वच मुले शेतकरी आहेत. पूर्वी शेतकरी मुलांच्या लग्नात मोठय़ा प्रमाणावर हुंडा घेत असत. आता परिस्थिती उलटली आहे. शेतकरी मुलांच्या लग्नासाठी पैसे देण्यास तयार असूनही मुलीकडील मंडळी आढेवेढे घेत आहेत.  – भाऊसाहेब धोंडगे, सरपंच, गट ग्रामपंचायत बहिराणे -महड, सटाणा