कोल्हापुरातील पांजरपोळ यादवनगरातील सलीम मुल्ला याच्या मटका अड्डयावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकावर हल्ला करून सर्व्हिस रिव्हॉल्वहर काढून घेत धमकावण्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. या प्रकरणी मालक सलीम यासीन मुल्ला व याची पत्नी, राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौर शमा मुल्लासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील शमा मुल्ला सह २० जणांना पोलीसांनी मंगळवारी अटक केली.

त्यांना न्यायालयात हजर केले असतान न्यायलयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पसार मटका बुकी सलीम मुल्लाचा पोलीस शोध घेत आहेत. अटक केलेल्यांमध्ये शमा सलीम मुल्ला, तौफीक सद्दाक शिकलगार, सज्जाद ईसाक नाईकवडी, दिलीप वामन कवडे, फिरोज खलील मुजावर, विजय मारूती सांगावकर, अरिफ रफिक शेख, आकाश लक्ष्मण पोवार, जमीर साहेबजी मुल्ला,शाहरुख रफीक लाड,उमेर मुजाहिद मोमीन, जावेद शौकत नाचरे,अजय बाळासाहेब कांबळे, साहिल नियाज मुजावर, ओंकार रविंद्र पारीसवाडकर, श्रीधर शिवाजी कांबळे, साहिल आमिन नदाफ, मुश्रीफ पठाण, इमाम आदम शेख, रोहित बाळू गायकवड यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर छापा टाकण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले होते. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक व प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने सोमवारी रात्री यादवनगर येथील मटका बुकी सलीम मुल्लाच्या मटका अड्डयावर छापा टाकला. यावेळी मुल्ला व त्याच्या समर्थकांनी पोलिसांवर हल्ला करून पोलिसांचे पिस्तुल घेऊन पळ काढला. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

हल्ला प्रकरणाची पोलिसांनी गांभिर्याने दखल घेतली आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्यात ५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. संशयितांवर पोलीसांवर हल्ला, हत्यार काढून घेऊन ते रोखणे, शासकीय कामात अडथळा, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत.