भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी अन्य एका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे ( उमेद ) देवगड व्यवस्थापक शिवाजी पांडुरंग खरात यांनी केली आहे.

कणकवली येथे या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना खरात यांनी सांगितले की, पंचायत समिती देवगड अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान ( उमेद ) आणि कृषी विभाग आत्मा, पंचायत समिती देवगड व नगरपंचायत देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील जामसंडे येथे गोगटे हॉलमध्ये गेल्या रविवारी (१४ ऑगस्ट) रानभाजी खाद्य व विक्री महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मी कार्यरत असलेल्या उमेद अभियान देवगड कार्यालयात किंजवडे प्रभाग समन्वयक या पदावर कार्यरत असलेल्या संगीता बांदेकर यांनी या कार्यक्रमात आमदार राणे यांच्याकडे माझी खोटी तक्रार केली. यानंतर या कार्यक्रमाच्या व्यासपीठाच्या मागे नेऊन आमदार राणे यांनी मला शिवीगाळ करायला सुरवात केली. तुला संपवतो अशी धमकी देऊन स्वतः मारहाण करत ” घ्या रे याला ” असा इशारा आपल्या कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर त्यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकत्यांनी मला हाताच्या ठोशाने तोंडावर, डोक्यावर, छातीवर, पाठीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

“हे एकनाथ शिंदेंना पटतं का? सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?”, अजित पवार संतापले

या घटनेनंतर मी देवगड पोलिस स्टेशनमध्ये त्याच दिवशी आमदार राणे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात दोन वेळा जाऊन फिर्याद नोंदवून घेण्याची विनंती केली. मात्र ती घेतली गेली नाही, अशी तक्रार करून खरात म्हणाले की, यानंतर मी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो. देवगड पोलिसांनी तेथे १५ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजल्याचा सुमारास जबाब नोंदवला, मात्र हा जबाब नोंदवताना आमदार राणे यांचे नाव न घेण्याचा दबाव पोलिसांनी माझ्यावर टाकला. तसेच जबाबाची प्रत मला दिली नाही किंवा तो मला वाचूनही दाखवलेला नाही. मात्र मी जबाब वाचला असल्याचे माझ्याकडून लिहून घेऊन माझी स्वाक्षरीही घेतलेली आहे.

Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

सध्या मी आणि माझे कुटुंबीय तणावाखाली आहोत. माझ्या घरी काही लोक येऊन धमकावत आहेत आणि माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे माझ्या जिवीतालाही धोका निर्माण झाला आहे. तरी आपण या विषयाला वाचा फोडावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याचेही खरात यांनी नमूद केले.

Story img Loader