राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढती महागाई आणि इंधन दरवाढीवरून भाजपावर निशाणा साधला आहे. आर्यन खानला जितके दिवस जेलमध्ये होता त्यादिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढले त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. त्या दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यन खानला आत ठेवले होते असे मला वाटते असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. गॅस दरवाढीमुळे मी दिवाळीमध्ये भाऊबीज म्हणून अजित पवार यांच्यासह इतर भावांकडे गॅस सिलेंडर मागणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे

 “सिलेंडरचा भाव वाढला आहे. मी अजित पवारांना या दिवाळीत  सांगणार आहे. आम्ही आठ बहिणींनी ठरवले आहे की आमच्या सहा भावांनी पुढच्या सहा महिन्यांसाठी आम्हाला प्रत्येकाने फक्त एक एक सिलेंडर द्यायचा. भाऊबीज पाहिजे का सिलेंडर पाहिजे मला सांगा,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

यावेळी सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबियाकडून साजरा होत असलेल्या दिवाळीचे किस्से यावेळी सांगितले. “आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये एकत्र बसून आम्ही फराळ करतो. प्रत्येकाला वेगवेगळे काम असते. करंजी बनवताना सर्वांकडे एक एक काम असते. यावेळी तिथे घरातील पुरुषांना प्रवेश नसतो. कारण फराळाच्या मध्ये अडथळा आणला की फराळ फसतो. या विभागामध्ये सर्वात कमी टॅलेन्टेड मी आहे. त्यामुळे थंड झालेली करंजी मोठ्या डब्यामध्ये ठेवण्याचे काम माझे असते. दिवाळी आणि दसऱ्यामध्ये जेवढा सिलेंडर आपल्याला लागतो तेवढा कधी लागत नाही. अशा काळात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव वाढला आहे. सरकारला आर्यनला खानला आत ठेवून आणखी भाववाढ करायची होती काय असे मला वाटत आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. संसदेत मी गॅसचे दर कमी करावेत यासंदर्भात मागणी करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या महागाईचा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.