सोलापूर : भांडणामुळे दुरावलेल्या आणि शरीर संबधास नकार देणाऱ्या पतीला धडा शिकविण्यासाठी पत्नीने त्याचे गुप्तांगच चाकूने कापल्याची घटना बार्शी शहरात उजेडात आली आहे. यासंदर्भात बार्शी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलेश काकासाहेब सांगळे ( वय २४, रा. घाटशिरूर, ता. केज जि. बीड ) हा तरूण मोबाईल शॉपी चालवीत असताना आलेल्या संपर्कातून त्याचे एका विवाहित महिलेशी प्रेम झाले, नंतर प्रेमाचे रूपांतर विवाहात झाले. मात्र पुढे दोघांमध्ये जमेना. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी कमलेश कोणालाही न सांगता बार्शी तालुक्यातील नातेवाईकाकडे येऊन राहिला होता. तो बार्शीत असल्याचे समजल्याने पत्नीने कमलेश यास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला.

हेही वाचा : “शत्रूच्या दारात जाऊन…”, पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वाढल्यानंतर पंकजा मुंडेंचं विधान; म्हणाल्या…

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur wife cuts husband private part in barshi css
First published on: 23-03-2024 at 21:42 IST