Premium

Video: “लंडनमधील वाघ नखे शिवाजी महाराजांची असतील तर…”, इंद्रजित सावंत यांचं सरकारला थेट आव्हान

“साताऱ्यात इ.स. १९१९ पर्यंत वाघ नखे असल्याच्या नोंदी आणि छायाचित्र आहेत, मग…”, असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलं.

sudhir mungatiwar indrajit sawant
इंद्रजित सावंत यांनी शिवाजी महाराज यांच्या वाघ नखांवरून सरकारला आव्हान दिलं आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरण्यात आलेली वाघ नखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचा सरकारचा दावा आहे. ती वाघ नखं पुढील तीन वर्षांसाठी राज्य सरकार आणणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी, १ ऑक्टोबरला ब्रिटनला रवाना होणार आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या सुरू झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही वाघ नखासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, सरकारनं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये. ही वाघ नखे शिवाजी महाराज यांच्या वापरातील असतील, तर सरकारनं त्याचे पुरावे सादर करावेत, असं आव्हान इंद्रजित सावंत यांनी दिलं आहे.

इंद्रजित सावंत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधाच्या वेळेला जी वाघ नखं तसेच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इ.स. १९१९ पर्यंत होती. कारण, ही शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. पण, आत्ता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघ नखं महाराष्ट्र सरकार भारतात परत आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघ नखं नाहीत हे स्पष्ट आहे.”
“साताऱ्यात इ.स. १९१९ पर्यंत वाघ नखे असल्याच्या नोंदी आणि छायाचित्र आहेत. मग, इ.स १९१९ च्या आधी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघ नख ही शिवाजी महाराज यांची असूच शकत नाही,” असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलं.

“इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराज यांना बसवलं होतं. त्या महाराजांनी ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, जो साताऱ्याचा रेसिडेंट सुद्धा होता आणि प्रतापसिंह महाराजांशी त्याची चांगली दोस्ती होती. त्यांना भेट म्हणून वाघनखं दिली होती. ती वाघनखं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ग्रँट डफ यांचा वंशज अंड्रियन ग्रँट डफ यांना तिथे दिसली असून तशी स्पष्ट नोंद म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहेत. त्या वाघ नखाच्या लेबलवर देखील उल्लेख असून संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये देखील ती वाघ नखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल वाघ नखे असल्याची अशी कोणतीही नोंद नाही,” असं इंद्रजित सावंत यांनी सांगितलं.

“शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नखे आणण्याची कथा रचली जात आहे. हे साफ खोटं आहे. इतिहासाच्या कसोटीवर हे टिकणार नाही. सरकारनं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये. ही वाघ नखे शिवाजी महाराज यांच्या वापरातील असतील, तर त्याचे पुरावे सरकारनं सादर करावेत,” असं आव्हान इंद्रजित सावंत यांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indrajit sawant challenge maha govt over london wagh nakhe ssa

First published on: 01-10-2023 at 11:40 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा